कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

कांदळवनातील निसर्ग पर्यटन

किनारपट्टीवरील जैवविविधतेचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा दृष्टिकोन.

कांदळवन आणि त्यानिगडित अधिवासांचे रक्षण करण्यामध्ये स्थानिक लोक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचा पर्यावरणाशी असलेला सहजीवनाचा संबंध त्याचे मुख्य कारण आहे. निसर्ग पर्यटन हे स्थानिक लोकांना आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संरक्षणाचा एक व्यवहार्य पर्याय उपलब्ध करुन देऊ शकते. महाराष्ट्रातील कांदळवन निसर्ग पर्यटन स्थळे महाराष्ट्र शासनाच्या ' कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना' अंतर्गत विकसित केली जातात. सदर योजना कांदळवन  कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाद्वारे कांदळवन सहव्यवस्थापन समित्यांमर्फत राबविण्यात येते.  

‘कांदळवन प्रतिष्ठान’ सध्या निसर्ग पर्यटनाअंतर्गत खालील गावांमध्ये काम करीत आहे. अधिक माहिती मिळण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.

जिल्हा गाव माहिती पत्रके  प्रकल्प समन्वयक संपर्क क्रमांक
पालघर

मारंबळपाडा (विरार)

मराठीसाठी येथे क्लिक करा

Click Here for English

कांदळवन सहव्यवस्थापन समिती, मारंबळपाडा 

९७६३०२७००७

९२८४१६२०४८

रायगड

काळिंजे

मराठीसाठी येथे क्लिक करा

Click Here for English

कांदळवन सहव्यवस्थापन समिती, काळिंजे

९२७२८८२४८२

८३८१०६४६४८

दिवेआगर 

मराठीसाठी येथे  क्लिक करा

 Click Here for English

कांदळवन सहव्यवस्थापन समिती, दिवेआगर 

८००७२८३६६८

७७६९९६२७७९

रत्नागिरी

आंजर्ले

मराठीसाठी येथे क्लिक करा

 Click Here for English

कांदळवन सहव्यवस्थापन समिती, आंजर्ले

९४०४७४५४७७

९४०४७६५६७५

७०३८४२५७९३

पावस   कांदळवन सहव्यवस्थापन समिती, पावस

८९७५३२२०८६
७५०७९६१०७०

नाचणे   कांदळवन सहव्यवस्थापन समिती, नाचणे ९८२२५०३३५८
७४४७३३०२०६

सोनगाव

मराठीसाठी येथे क्लिक करा

Click Here for English

कांदळवन सहव्यवस्थापन समिती, सोनगाव ६९३७६५४३२७
सिंधुदुर्ग

तारामुंबरी

Click Here कांदळवन सहव्यवस्थापन समिती, तारामुंबरी ७४४७५८००४२
मिठमुंबरी   कांदळवन सहव्यवस्थापन समिती, मिठमुंबरी

९७६५०९१७२९

९५९५१९५६९५

वैंगुर्ला   कांदळवन सहव्यवस्थापन समिती, वैंगुर्ला ८८०६४६५२८६

निवती

 Click Here कांदळवन सहव्यवस्थापन समिती, निवती

९४०५२३२६२९

९५९५१९५६९५

आचरा   कांदळवन सहव्यवस्थापन समिती, आचरा

८३९०४६९५९०

९५९५१९५६९५

 आंजर्ल्यातील कासव महोत्सव
आंजर्ल्यातील कयाकींग आणि बोट सहल
 

कांदळवन निसर्ग पर्यटन हे स्थानिक समुदायांसाठी उपजीविकेचे साधन होण्यासोबतच कांदळवन अधिवासाबद्दल तुटपुंजी माहिती असणाऱ्या पर्यटकांमध्ये जागृकता निर्माण करण्यातही मदत करते. रायगडमधील काळिंजे आणि दिवेआगर, रत्नागिरीतील आंजर्ले आणि सोनगाव, सिंधुदुर्गमधील तारामुंबरी, मिठमुंबरी आणि निवती यांसारख्या गावांमधील स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यामध्ये कांदळ प्रजातींची ओळख, पक्षी प्रजातींची ओळख, पक्षी निरीक्षणाचे तंत्र, किनारी आणि सागरी जैवविविधतेची ओळख, निसर्ग पर्यटनाची संकल्पना व त्यामधील तत्वे, स्थानिक पदार्थाना अधिक बाजारयोग्य बनवण्याचे प्रशिक्षण, तारका निरीक्षण आणि जीवरक्षण प्रशिक्षण इ. उपक्रमांचा समावेश आहे. कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनाचा हा उपक्रम स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी आणि कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धनास प्रोत्साहित करण्यासाठी हाती घेतलेल्या समुदाय-आधारित संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुरुवातीच्या तांत्रिक आणि आर्थिक पाठिंब्यानंतर, निसर्ग पर्यटनाच्या या प्रकल्पाचे नियोजन संपूर्णपणे स्थानिक समुदायांव्दारे करण्यात येणार आहे.

कालिंजेमधील कांदळवन सहल
 सोनगावमधील मगर सहल
 
रायगडमधील काळिंजे निसर्ग पर्यटन
काळिंजे गावातील नौका स्वारी
 

कांदळवन निसर्ग पर्यटनाची ठळक वैशिष्ट्ये

  • स्थानिक समुदायांचा सहभाग
  • उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन
  • पर्यावरणावर कमी दुषपरिणाम
  • पर्यटकांसाठी व्यवहार्य पर्याय
  • समुदाय-आधारित संवर्धन
  • शिक्षण आणि जनजागृती
  • निसर्ग संवर्धन
निसर्गपर्यटन कार्यशाळा
 

मुख्य उपक्रम

  • कांदळवन नौका स्वारी
  • निसर्ग भ्रमंती / पक्षी निरीक्षण
  • कांदळवन भ्रमंती
  • किनारा भ्रमंती आणि किनाऱ्यांवरील खडक टाळ्यांमधील जैवविविधतेचे निरीक्षण
  • भ्रमंती / नौका स्वारी दरम्यान मत्स्यपालन प्रकल्प किंवा कांदळवन वृक्षारोपणाच्या स्थळांना भेट
  • आसपासच्या ऐतिहासिक स्थळांना भेट
  • स्थानिक पाककृती आणि पारंपारिक जेवण
 
कासव मादीच्या पाउलखुणा - अंजार्ले, रत्नागिरी
रत्नागिरीतील नयनरम्य सोनगाव निसर्ग पर्यटन स्थळ
 
सिंधुदुर्गमधील स्वामिनी बचतगटाची नौका स्वारी 
तारका निरीक्षण कार्यशाळा
 
कासव महोत्सव, आंजर्ले