‘किनारी व सागरी जैवविविधता केंद्रा’चे उद्घाटन ३० एप्रिल, २०१७ रोजी श्री. सुधीर मुनगंटीवार, अर्थ आणि नियोजन व वनमंत्री, महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटकांना महाराष्ट्राच्या किनारीआणि सागरी जैवविविधतेबद्दल माहिती देण्याकरिता ठाणे खाडी परिसरातील एका जागेत अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असलेले हे केंद्र उभारण्यात आले.
राज्याच्या किनारीआणि सागरी वैविध्याविषयीची माहिती यांत्रिक उपकरणांव्दारे दृष्य, श्राव्य आणि स्पर्शिक घटकांच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट्य या केंद्राचे आहे. त्याचबरोबर, किनारी जैवविविधतेच्या महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिकेबद्दल आणि जैवविविधतेला असणाऱ्या धोक्यांबद्दल पर्यटकांना माहिती देण्याचे ध्येयही या केंद्राच्या उभारणी मागे होते. दृष्य आणि श्राव्य माध्यमातून संवाद साधण्यासाठी तयार केलेले संगणकीय पडदे आणि माहितीपट पाहण्यासाठी बांधलेला नाट्यगृह केंद्राचे ध्येय साध्य करण्यासाठी पूरक ठरले आहेत.
प्रवेश शुल्क | |||
प्रौढ व्यक्ती | शालेय विद्यार्थी | वरिष्ठ नागरिक | ५ वर्षांखालील मुले |
---|---|---|---|
₹50 | ₹25 | ₹40 | विनामूल्य प्रवेश |
केंद्राला भेट व बोट सफारीकरिता संपर्क: +91 99876 73737
वार्षिक पर्यटक संख्या | ||||
वर्ष | 2017-2018 | 2018-19 | 2019-2020 | 2021-22 |
---|---|---|---|---|
पर्यटकांची संख्या | 6,134 | 10,183 | 10,056 | 11,252 |

केंद्रातील प्रमुख आकर्षण :
- ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात आढळत असलेल्या समृद्ध किनारी आणि सागरी जैवविविधतेचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन.
- फ्लेमिंगो, खंड्या इत्यादी पक्षी आणि इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि देवमाशासारख्या समुद्री सस्तन प्राण्यांचे ध्वनी.
- किनारपट्टी आणि सागरी जैवविविधतेबद्दलची मनोरंजक माहिती आणि छायाचित्रे हे संगणकीय पडदे आणि एलईटी डिस्प्ले यांच्या माध्यमातून प्रदर्शित होतात.
- ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या जैवविविधतेविषयी माहितीपट दाखविण्यासाठी तयार केलेेले छोटे नाट्यगृह.
- ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात येणारे हजारो फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी बोट सफारी.


या केंद्रात दृष्य, श्राव्य, स्पर्शिक घटकांचा तांत्रिक वापर करण्यात आला आहे.





