- तुम्ही आता येथे आहात
- मुख्य-पृष्ठ
- आमच्याविषयी
- महत्वाचे टप्पे
कांदळवन कक्षाच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे
-
2005
- उच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशान्वये कांदळवने नष्ट करण्यावर आणि कांदळवन जमिनींवर भराव टाकण्यास बंदी घातली.
-
2008
- महाराष्ट्र शासनाने कांदळवनांना संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले.
-
2012
- महाराष्ट्रातील कांदळवनांच्या संवर्धनासाठीच्या उपाययोजना अंमलात आणण्याकरिता महाराष्ट्र सरकारने 'कांदळवन कक्षा'ची स्थापना केली.
-
2013
- महाराष्ट्र शासनाने कांदळवनांना श्रेणी वाढ करून राखीव वनांचा दर्जा दिला.
- 'मुंबई कांदळवन संधारण घटका'ची स्थापना झाली.
-
2015
- महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान (कांदळवन प्रतिष्ठान)'ची स्थापना केली.
- भारतीय वन सर्वेक्षण, देरादून यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राज्य वन अहवाल, २०१५' अनुसार महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रामध्ये १९% वाढ झाली.
-
2017
- ऐरोली येथील ‘किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा’चे उद्घाटन
- भारतीय वन सर्वेक्षण, देरादून यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राज्य वन अहवाल, २०१७' अनुसार २०१५ च्या तुलनेत महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रात ३६% वाढ झाली.
-
2018
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या 'भारत सरकार - संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम - विश्व पर्यावरण वित्त' प्रकल्पासाठी या जिल्ह्याला जैविक संपत्तिच्या शाश्वत वापरासाठी २०१८ चा 'भारतीय जैवविविधता पुरस्कार' मिळाला.
- मुंबई शहरातील नागरिक आणि 'कांदळवन कक्षा'च्या वतीने राबिवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या सरकारी-नागरिक भागीदारीतील कांदळवन स्वछता मोहिमेची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्' मध्ये झाली.
-
2019
- भारतीय वन सर्वेक्षण, देहेरादून यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राज्य वन अहवाल, २०१९' अनुसार २०१७ च्या तुलनेत महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रात ५% वाढ झाली
-
2020
- राज्य कांदळ वृक्ष म्हणून 'पांढरी चिप्पी (सोनरेशिया अल्बा') ला घोषित करण्यात आले.
- कांदळवन कक्षाला नॅटवेस्ट गृपच्या अर्थ गार्डीयन या श्रेणी अंतर्गत पुरस्कृत करण्यात आलं.
- ' Handbook of Mangroves of Maharashtra' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
- ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रास 'स्वच्छ शासकिय कार्यालय २०२०' हा पुरस्कार मिळाला.
-
२०२१
- 'सोनरेशिया' या त्रैमासिक वृत्तिकेच्या पहील्या भागाचे प्रकाशन झाले.
- भारतीय वन सर्वेक्षण, देहेरादून यांनी प्रसिद्ध केलेल्या 'राज्य वन अहवाल, २०२१' अनुसार २०१९ च्या तुलनेत महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रात १.२% वाढ झाली