कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

यूएनडीपी प्रकल्प

तुलनात्मक तांदळाची कापणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत सरकार - संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम - विश्व पर्यावरण वित्त प्रकल्प

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी व सागरी जैवविविधतेचे मुख्य प्रवाह’ या विषयावर २०१२ ते २०१७ या कालावधीत 'भारत सरकार - संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम - विश्व पर्यावरण वित्त' प्रकल्पाने कांदळवन कक्षाला किनारपट्टी आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम सुरू करण्याची संधी दिली. या प्रकल्पाने मत्स्यपालन, पर्यटन, शेती आणि वनीकरण अशा सर्व उत्पादन क्षेत्रांचा समावेश करून क्रोस-सेक्टरल दृष्टीकोन स्वीकारला. या प्रकल्पामुळे १९,५७४ लाभार्थांना फायदा झाला.

प्रकल्पाची माहिती
अर्थसंकल्प : US$ 3,438,294

सह-वित्तपुरवठा : US$ १२,०००,००० (भारत शासन आणि महाराष्ट्र शासन)

कालावधी : २०१२ ते २०१७

अंमलबजावणी करणारे भागीदार : पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार

स्थान : सिंधुदुर्ग किनाऱ्यासह देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांचा समावेश

 

या प्रकल्पामधील अविभाज्य घटक :

  • श्री पद्धतीच्या शेती तंत्राची भातशेतीची नवी पद्धत  म्हणून ओळख.
  • डायव्ह मास्टर पातळीपर्यंत २० स्थानिक तरुणांना स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण आणि समुद्रातून २ लाख चौरस मीटर जाळे बाहेर काढणे.
  • शाश्वत उपजीविकेसाठी कालवे, शिंपले पालन, खेकडा पालन, मास्यांची पिंजऱ्यातील शेती  आणि शोभिवंत माशांच्या प्रजातींचे पालन असे प्रकल्प राबवणे. त्यामुळेे  ४,९७२ लाभार्थींना फायदा.
  • कासव संवर्धनामुळे २८० घरट्यांचे संरक्षण झाले. १९९३ कासवांच्या १६,७५८ पिल्लांना समुद्रात सोडले.
  • इंडो-पॅसिफिक हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पाॅरपाॅईस यांसारख्या सागरी सस्तन प्राण्यांचे मूल्यांकन.
  • जालनौकांसाठी चौकोनी जाळीच्या जाळ्याचा अवलंब करून शाश्वत सागरी मासेमारी.
  • निसर्ग पर्यटन प्रकल्पामुळे ‘स्वामिनी’ महिला बचत गटाची स्थापना झाली.
  • स्थानिक समुदाय आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकरिता क्षमता बांधणी, प्रशिक्षण आणि जनजागृती.
 
या प्रकल्पाला जैविक संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी २०१८ मध्ये 'भारतीय जैवविविधता पुरस्कार' हा पुरस्कार मिळाला.
 
कांदळवन नौका स्वारी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
बचत गट निर्मित खाद्य उत्पादने
 
Integrated Multi-trophic Aquacuture (IMTA) बहुआयामी मत्स्य शेती 
श्री पद्धतीने भात शेती