कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना

महाराष्ट्र शासनाने २० सप्टेंबर २०१७ पासून महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ ही योजना सुरू केली. कांदळवन 'प्रतिष्ठाना'तर्फे ही योजना गावांमध्ये तयार केलेल्या 'कांदळवन सह-व्यवस्थापन समिती'च्या मार्फत राबविली जात आहे. या योजनेमध्ये गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना ९०% अनुदान मिळते, तर वैयक्तिक प्रकल्पाला (१ एकरपेक्षा जास्त खाजगी कांदळवन जमीन असणार्‍या मालकांना) ७५% अनुदान मिळते. २०१७ ते २०१९ या वर्षांमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील १०४ गावे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडली गेली आहेत.

या योजनेतील बचत गटांची संख्या

अ.नु. जिल्हा खेकडा पालन शोभिवंत मत्स्य पालन पिंजऱ्यातील मत्स्य शेती कालवे पालन निसर्गपर्यटन जिताडा प्रकल्प एकूण
पालघर २३ ३८
ठाणे २२ २३
रायगड १२ १० ३१
रत्नागुरी १३ १३ ४६
सिंधुदूर्ग २८ ३५ २१ ९४
  एकूण २९ ९४ ६० ३७ २३२

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील विविध गावांमध्ये पुढील उपक्रम राबविले जात आहेत

खेकडा शेती: 'राजीव गांधी सेंटर फॉर अ‍ॅक्वाकल्चर'च्या सहकार्याने कांदळवनांमध्ये ‘पेन’ पद्धतीची संरचना वापरुन खेकडा शेती केली जात आहे.

खेकडा शेतीकरीता पेन पद्धतीची संरचना
खेकडा पालन प्रकल्पातील जाळ्यांची रचना 
 

कालवे शेती: कालवांच्या शेतीसाठी बांबूंचे तरंगते तराफे आणि बांबूंचे स्थिर तराफे अश्या दोन पद्धती वापरल्या जातात.

कालव्यांचा स्थिर तराफा
कालव्यांचा तंरगता बांबूंचा तराफा
 
तराफ्यांच्या दोर्‍यावरील शिंपल्यांना चिकटलेले कालवे
 

पिंजऱ्यातील मत्स्यपालन: 'भा.कृ.अनु. प्र. - केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान'च्या सहकार्याने जिताडा, काळुंदर आणि तांबोशी माशांची मत्स्यशेती केली जाते.

पिंजऱ्यातील मत्स्यपालन पद्धती 
जिताडा मत्स्य पालन प्रकल्प
 

सागरी आणि गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांचे संगोपन: ऐरोलीच्या 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा'त क्लाउन फिश सारख्या शोभिवंत माशांचे उबवणी केंद्र स्थापित करण्यात आले आहे.

शोभिवंत मासे पालन प्रकल्प 
शोभिवंत माशांचे उबवणी केंद्र
 

कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन : 'कांदळवन प्रतिष्ठान'ने महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात निसर्ग पर्यटनाची क्षमता असणारी काही ठिकाणे शोधली आहेत. याठिकाणी नौका स्वारी, निसर्ग भ्रमंती, न्याहारी निवास, पारंपारिक जेवण यांसारखे उपक्रम सुरू आहेत.

कांदळवन कयाकिंग सहल 
आंजर्ल्यातील कासव पिल्लाची समुद्राकडे वाटचाल - कासव महोत्सव विशेष