कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

भरपाई योजना

‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ अंतर्गत संरक्षित असलेले सागरी जीव मासेमारीच्या जाळ्यात अडकल्यास, जाळे कापून त्यांना सोडल्याबद्दल मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या भरपाईची विशेष योजना.

Imprtant Marine Protected Species

महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध किनारपट्टी क्षेत्रात ‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ मध्ये समाविष्ट असलेल्या अनेक सागरी प्रजाती आढळतात. यामध्ये निळा देव मासा, ब्रुडीज देवमासा, डॉल्फिन, करवत मासा, व्हेल शार्क, सागरी कासवे या प्रजातींचा समावेश आहे. काहीवेळा या संरक्षित प्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्या जातात. प्रसंगी जाळे कापून या संरक्षित जीवांना पुन्हा समुद्रात सुरक्षितरित्या सोडल्यास मच्छिमारांना कापलेल्या जाळ्याची भरपाई म्हणून या योजनेअंतर्गत कमाल २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.

भरपाई योजनेअंतर्गत समुद्रीकासवाची सुटकाभरपाई योजनेअंतर्गत समुद्रीकासवाची सुटका
भरपाई योजनेचा लाभ मिळालेले मासेमार बांधवभरपाई योजनेचा लाभ मिळालेले मासेमार बांधव
 

संयुक्तरित्या दिली जाणारी ही नुकसान भरपाई योजना (शासन निर्णय क्र. मत्स्यवि- १११८/प्र.क्र.७५/पदुम-१४, दि. २१/१२/२०१८) कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग यांनी सुरू केली आहे.

‘कांदळवन प्रतिष्ठाना’ अंतर्गत संरक्षित सागरी जीवांसंबंधी प्रबोधन करण्यासाठी मच्छीमार समुदायांसाठी जनजागृती कार्यशाळांचे आयोजित करण्यात येते. या योजनेअंतर्गत आजवर ५९ मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

सागरी संरक्षित प्रजाती व नुकसान भरपाई योजनेवरील जागरूकता निर्मितीसाठी कार्यशाळा सागरी संरक्षित प्रजाती व नुकसान भरपाई योजनेवरील जागरूकता निर्मितीसाठी कार्यशाळा
मच्छीमारांसाठी सागरी संरक्षित प्रजातींवर कार्यशाळा मच्छीमारांसाठी सागरी संरक्षित प्रजातींवर कार्यशाळा
 

मच्छीमारांसाठी घेतलेल्या कार्यशाळांचा आढावा

क्रं. कार्यशाळेची तारीख जिल्हा स्थान सहभागी मच्छीमारांची संख्या
१. ६ जून २०१९ मुंबई आणि मुंबई उपनगर ससून डाॅक ११८
२. १५ जून २०१९  ठाणे उत्तन ७९
३. २१ ऑगस्ट २०१९ पालघर पालघर १२३
४. १२ जुलै २०१९ रायगड नागाव ६०
५. २५ जुलै २०१९ रत्नागिरी रत्नागिरी १००
६. १७ जुलै २०१९ गुहागर ५००+
७. १२ ऑगस्ट २०१९ आडे ५०
८. २७ ऑगस्ट २०१९ सिंधुदुर्ग मालवण ५९

जानेवारी 2022 पर्यंत महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या २६४ प्रकरणांपैकी २५३ मच्छीमारांना एकूण रु. ४०,७८,०५०/- (चाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार पन्नास) इतके नुकसान भरपाई अदा करण्यात आली.

अनु क्र. सोडलेल्या प्रजातीचे नाव संख्या भरपाई रक्कम(रु.)
1. ऑलीव्ह रिडले कास 158 20,56,750
2. ग्रीन सी कासव 74 11,64,800
3. हॉक्सबिल कासव ८६,८००
4. लेदरबॅक समुद्री कासव 2 25,000
5. बहिरी मासा (व्हेल शार्क) 38 8,79,700
6. लांजा (जाएंट गिटारफिश) 6 85,000
7. गादा (हंप बॅक डॉल्फिन) 1 25,000
8. बुलीया (फिनलेस पोर्पोईस) 4 1,00,000
एकूण   288 44,23,050