कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व

'व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व' धोरण 

भारत सरकारच्या 'कॉर्पोरेट कार्य मंत्रालया'ने, २०१३ साली ‘कंपनी कायदा’ अस्तित्वात आणला. याअन्वये काॅर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्यासाठी सामाजिक कल्याणकारी उपक्रमांकरिता 'व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व' प्रकल्प हाती घेण्यासंदर्भात वैधानिक बंधने घालण्यात आली. अशा प्रकारचा हा जगातील सर्वात मोठा प्रयोग होता. या अधिनियमान्वये नोंदणीकृत काही निवडक कंपन्यांसाठी 'व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व' अनिवार्य करणारा भारत हा एकमेव देश आहे. हा उपक्रम देशामध्ये शाश्वत विकास आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या क्षेत्रात परिवर्तन निर्माण करणारा ठरत आहे. कॉर्पोरेट व्यवसायाच्या मूल्य साखळीत सामाजिक, पर्यावरणीय आणि मानवी विकासाच्या समस्यांना समाकलित करण्यासाठी एक साधन म्हणून 'व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व'ची कल्पना केली गेली. ‘कंपनी कायद्या’चे कलम १३५ हे कंपन्यांना त्यांच्या उत्पन्न क्षमतेनुसार 'व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व'ची मर्यादा प्रदान करते. उदा. (अ) कंपनीची उलाढाल ५०० कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम; (ब) कंपनीची उलाढाल १,००० कोटी किंवा त्याहून अधिक असेल; (क) कंपनीचा निव्वळ नफा ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक असेल. 'व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व' नियमांनुसार 'व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व'च्या तरतुदी केवळ भारतीय कंपन्यांनाच लागू नाहीत, तर भारतातील परदेशी कंपनीच्या शाखा व प्रकल्प कार्यालयांनाही लागू आहेत.

Small grant program अजमेरा गटासोबत सामंजस्य करार 
Small grant program आय.सी.आय.सी.आय. बँकेसोबत सामंजस्य करार
 

कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आमची काही प्रतिमाने

किनाऱ्यांलगत राहणाऱ्या समुदायांसाठी शाश्वत उपजीविका प्रकल्पांची निर्मिती

 • शाश्वत मत्स्यशेतीविषयक कामे स्वीकारणे
 • कौशल्य विकास आणि क्षमता बांधणी
 • महिला बचतगट ही संकल्पनेचा प्रसार
 • निसर्ग पर्यटनाचा प्रचार

कांदळवनक्षेत्रामध्ये वाढ करणे

 • राज्यभर कांदळ प्रजांतींचे रोपण करणे
 • अस्तित्त्वात असलेल्या कांदळ रोपांसाठी संरक्षणाचा उपाय
 • सीमांकन केलेल्या कांदळवनक्षेत्रांना कुंपण घालणे

शिक्षण आणि जागृकता

 • शालेय मुलांसाठी परिषद
 • किनारी व सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोली येथे शालेय कार्यक्रम
 • जनजागृतीपर कार्यशाळा
 • प्रकाशने

पायाभूत सुविधा आणि उपकरणे

 • गस्त घालण्याकरिता वाहने, पाळत ठेवणारी उपकरणे, संप्रेषण उपकरणे आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणे पुरविणे
 • वनरक्षकांच्या मुक्कामासाठी सुविधा विकसित करणे
जे.एस.डब्ल्यू. गटासोबत सामंजस्य करार
Small grant program स्कोडा - फोक्स व्हेगन गटासोबत सामंजस्य करार
 
Small grant programस्कोडा - फोक्स व्हेगनच्या कार्यसंघाची अलिबाग रोपवनाला भेट

व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व भागीदारी

२०१७ मध्ये नवी मुंबईत कांदळवनांचे वृक्षारोपन

 • ‘व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ आश्वासित निधी ₹ ५२.८ लाख प्राप्त निधी ₹ ३०.५ लाख 
 • नवी मुंबईतील करावे आणि कौपरखैराणे येथे असलेल्या २० हेक्टरवरील खारफुटीच्या वाढीसाठी
 • ३१ ऑक्टोबर, २०१७ रोजी सामंजस्य करार झाला.
 • कालावधी -  ५ वर्षे 

२०१९ मध्ये नवी मुंबईतील ‘किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोली’ येथे शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम

 • ‘व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ आश्वासित निधी ₹ ३२ लाख प्राप्त निधी ₹ ३२ लाख 
 • विद्यार्थ्यांना शाळेतून या केंद्रात आणण्यासाठी आणि त्यांना शाळेत परत जोडण्यासाठी ३५ आसनी वातानुकूलित बसची खरेदी
 • शिक्षण आणि जागृकता कार्यक्रमासाठी ही बस वापरली जात आहे
 • ५ जानेवारी, २०१९ रोजी सामंजस्य करार झाला.

२०१९ मध्ये रायगड जिल्ह्यातील शोभिवंत मत्स्यपालन कार्यक्रम

 • प्राप्त झालेला ‘व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ निधी - १२ लाख रुपये
 • रायगडमधील सालाव, निगडी, शिर्की चाल आणि वढाव या गावात जे.एस.डब्ल्यू. कडून शोभिवंत माशांच्या संगोपनासाठी हॅचरी शेड दान करण्यात आल्या.
 • २८ जानेवारी, २०१९ रोजी सामंजस्य करार झाला.

२०१९ मध्ये मुंबईत कांदळवन संरक्षण कार्यक्रम

 • ‘व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ आश्वासित निधी ₹ ८४.१६ लाख प्राप्त निधी ₹ ८४.१६ लाख 
 • ‘अजमेरा रियाल्टी’ने कांदळवन संरक्षण कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी मुंबईतील वडाळा विभागामधील खारफुटीच्या संरक्षणासाठी कुंपण घालून दिले.
 • २१ नोव्हेंबर, २०१९ रोजी सामंजस्य करार झाला.
 • कालावधी - २ वर्षे 

२०१९ मध्ये रायगडमध्ये कांदळवनांचे वृक्षारोपण

 • ‘व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ आश्वासित निधी ₹ ३.०८ करोड प्राप्त निधी ₹ १.७३ करोड 
 • रायगडमधील अलिबाग वनपरिक्षेत्रातील १०० हेक्टर जमिनीवर खारफुटीच्या वाढीसाठी
 • २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी सामंजस्य करार झाला.
 • कालावधी - ७ वर्षे 

रत्नागिरी जिल्ह्यात कांदळवनांचे वृक्षारोपण

 • ‘व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ आश्वासित निधी ₹ ५० लाख प्राप्त निधी ₹ ३३.२५ लाख 
 • रत्नागिरीमधील २५ हेक्टर वन जमिनीच्या पुर्नभरणासाठी
 • ३ जानेवारी, २०२० रोजी सामंजस्य करार झाला.
 • कालावधी- ३ वर्षे 
जेम अँड ज्वेलरी नॅशनल रिलीफ फौंडेशन

कांदळवनांचे वृक्षारोपण

 • ‘व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ आश्वासित निधी ₹ १ करोड  प्राप्त निधी काही नाही 
 • ५० हेक्टर वर कांदळवन रोपवनासाठी वापर केला जोईल
 • १७ फेब्रुवारी, २०२० रोजी सामंजस्य करार झाला.
 • कालावधी - ७ वर्षे 

व्यावसायिक-सामाजिक उत्तरदायित्व’ माहितीपत्रक डाउनलोड करा (इंग्रजी)