कांदळवन कक्षाने पुढील उपक्रमांव्दारे राज्यातील कांदळवनक्षेत्र वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत :
१) कांदळवन संरक्षण
- भारतीय वन अधिनियम, १९२७ नुसार ‘राखीव वनक्षेत्र’ म्हणून घोषित केलेल्या कांदळवनांचे संरक्षण.
- महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्राच्या स्थितीवर बारीक नजर ठेवण्यासाठी उपग्रह नकाशा रेखन.
- कांदळवन क्षेत्रातील गस्त
- कांदळवन जमिनींवरील बेकायदा अतिक्रमण हटविणे
- प्रभावी संवर्धन आणि संरक्षणात्मक उपाययोजनांकरिता कर्मचार्यांची क्षमता वाढविणे.
२) कांदळवनांचे वनीकरण
- किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमधील कांदळवनांच्या रोपवाटिका तयार करणे.
- अवनत कांदळवन क्षेत्रांवर कांदळवने आणि त्याच्या संलग्न प्रजातींची लागवड करणे.
वर्ष | 2013 | 2014 | 2015 | 2016 | 2017 | 2018 | 2019 |
---|---|---|---|---|---|---|---|
रोपांची संख्या | 2.5 लाख | 4.4 लाख | 4.88 लाख | 3.55 लाख | 6.44 लाख | 21.77 लाख | 29.10 लाख |
३) स्वच्छता मोहिम
- राज्यभरात दरवर्षी कांदळवन स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते.
- २०१५ मध्ये मुंबई शहरातील नागरिक आणि कांदळवन कक्षाच्या नेतृत्वामध्ये राबविलेल्या ‘दी क्लिन मॅंग्रोव्ह कॅम्पेन’ या सर्वात मोठ्या सरकारी-नागरिक भागीदारी प्रकल्पांपैकी एक असलेल्या स्वच्छता मोहिमेची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्' मध्ये करण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून आत्तापर्यंत मुंबईतील ११.०३ चौ.किमी कांदळवन क्षेत्रातून ८,००० टन (मुख्यत: प्लॅस्टिक) कचरा साफ करण्यात आला आहे.
प्रसार माध्यमातील प्रकाशित वृत्तांकन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
४) जनजागृती
- निसर्ग शिक्षण आणि कांदळवन सहल.
- निसर्ग आणि वन्यजीवांसंबंधीत असलेले राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करणे.
- महाराष्ट्राच्या किनारी आणि सागरी जैवविविधतेबद्दल तरुणांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे. फलक प्रदर्शने आयोजित करणे, छायाचित्रण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, तरुणांसाठी प्रदर्शनाचे आयोजन.
- सागरी संरक्षित प्रजातींबाबत मासेमारी समुदायांत जनजागृती निर्माण करण्याकरिता कार्यशाळा आयोजित करणे.
- नवी मुंबईतील ऐरोली येथील ‘किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रा’चा विकास करणे



