'कांदळवन प्रतिष्ठान' विविध सरकारी संशोधन संस्था, स्वयंसेवी संशोधन संस्था आणि वैयक्तिक संशोधकांना कांदळवनांशी निगडित संशोधन प्रकल्पांवर काम करु देण्यासाठी एखाद्या आयोगासारखी काम करते. सध्या कांदळवन, पाणपक्षी, पाणमांजर, मगर, सागरी कासवे, प्रवाळ, समुद्री साप, इ. पर्यावरणीय परिसंस्था आणि जीवांवर संशोधनाचे काम 'कांदळवन प्रतिष्ठाना'अंतर्गत सुरू आहे. काही संशोधन प्रकल्प विशिष्ट प्रजातींचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील आढळ आणि आधारभूत माहितीचे संकलन करण्याचे काम करत आहेत. (उदा. पाणमांजर, मगर, कांदळ प्रजाती). तर काही संशोधन प्रकल्पांअंतर्गत विशिष्ट प्रजातींवर पर्यावरणीय बदलांच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येत आहे. जसे की, समुद्री सापांचे खाद्य, कांदळ प्रजातींवर होणारे कीटकांचे पर्याक्रमण. इतर काही प्रकल्प कांदळवन क्षेत्रांचे नकाशीय संकलन, मत्स्यपालनासाठी उपयुक्त ठरु शकणाऱ्या जलसाठ्यांचा शोध इत्यादींशी संबंधित आहेत.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील प्रवाळ, झुअँथिड्स आणि शार्क-पाकटच्या (इलास्मोब्रान्च) प्रजातींविषयक संशोधन प्रकल्प 'कांदळवन प्रतिष्ठाना'तील तज्ज्ञांमार्फत राबविण्यात येत आहेत. तसेच 'कांदळवन प्रतिष्ठाना'ने तरुण संशोधकांना किनारपट्टी व सागरी जैवविविधतेशी निगडित संशोधनाकरिता संधी आणि प्रोत्साहन देण्यासाठी लघु अनुदान उपक्रमाचे नियोजन केले आहे.


प्रमुख प्रकल्प
मत्स्यपालन उपक्रमांमधील संशोधन
- खाड्या आणि नदीमुखांचे सर्वेक्षण - 'भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय खरा जलजीव पालन अनुसंधान संस्थान' या संस्थेला हा प्रकल्प दिला असून त्यात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मत्स्यपालनाकरिता योग्य असणाऱ्या खाड्यांचे आणि नदीमुखांचे सर्वेक्षण व पिंजऱ्यातील मत्स्यशेती, एकात्मिक बहु प्रजातीय मत्स्यपालन आणि चिखल खेकडा शेतीसाठी उपयुक्त जागा शोधणे.
- क्लाऊन माशांचे उबवणी केंद्र - ऐरोलीतील ‘किनारा व सागरी जैवविविधता केंद्रा’मध्ये क्लाऊन माशांचे उबवणी केंद्र उभारण्यात आले आहे.
- बहु प्रजातीय उबवणी केंद्र - सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहु प्रजातीय उबवणी केंद्र प्रस्तावित आहे. त्यामध्ये चिखली खेकडे, शिंपले (कालवे आणि तिसऱ्या), जिताडा मासा, इ. च्या उबवणी केंद्राचा समावेश आहे. हे उबवणी केंद्र 'समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण - राजीव गांधी जलकृषी केंद्र', 'भारतीय कृषी अनुसंधान परिषद -केंद्रीय समुद्री मत्स्यकी अनुसंधान संस्थान' आणि 'भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय खरा जलजीव पालन अनुसंधान संस्थान'च्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे.

समुद्री कासव संवर्धन आणि संशोधन
- महाराष्ट्रातील ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या घरट्याच्या परिस्थितीकीचा अभ्यास- २००२ पासून उपलब्ध असणाऱ्या कासव विणीच्या आकडेवारीची तुलना केल्यास, असे निदर्शनास येते की, कासवांचा घरटी करण्याचा कालावधी बदलून हिवाळ्यामध्ये (डिसेंबर ते मार्च) झाला आहे. घरट्यामधील तापमान वाढल्यास अंड्यामध्ये मादी प्रजातीचे भ्रूण विकसित होतात. तसेच उन्हाळी महिन्यांमध्ये घरट्यामधून पिल्ले बाहेर पडण्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले आहे.
- महाराष्ट्र वन विभागाचे कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या भरपाई योजनेअंतर्गत जुलै, २०२० पर्यत २८ ऑलिव्ह रिडले, १६ ग्रीन सी कासव, १ हॉक्सिबल सागरी कासव आणि १ लेदरबॅक प्रजातीच्या कासवांना वाचविण्यात आले आहे.


‘इलास्मोब्रान्च’ (शार्क, पाकट इ.) गटातील प्रजातींचे संवर्धन आणि संशोधन
- महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सापडलेल्या ‘इलास्मोब्रान्च’ गटातील प्रजातींची नोंद - महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामधून ‘इलास्मोब्रान्च’ गटातील २४ प्रजातींची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी परिक्षेत्रात धोकाग्रस्त ‘इलास्मोब्रान्च’ गटातील प्रजातींचे प्रजनन अधिवास आढळून आले आहेत.
- महाराष्ट्र वन विभागाचा कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या भरपाई योजनेअंतर्गत जुलै, २०२० पर्यत १ जायन्ट गिटारफिश आणि १७ व्हेल शार्क माशांना वाचविण्यात आले आहे.


प्रवाळ संवर्धन आणि संशोधन
- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील प्रवाळांच्या वैविधतेचे मूल्यांकन - ‘भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था' या संस्थेला हा प्रकल्प दिला.
- कृत्रिम प्रवाली व प्रवाळांचे प्रतिरोपण - ‘सुगंथी देवदासन समुद्री संशोधन संस्था’ आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ यांनी या प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्य दिले आहे. ४५० कृत्रिम प्रवाली आणि ६०० प्रवाळ प्रतिरोपण रचनाप्रणाली तयार करून स्थानिकांच्या मदतीने मालवण आणि वेंगुर्ला किनाऱ्याजवळच्या सागर क्षेत्रात लावण्यात आल्या आहेत.
- सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील प्रवाळ विविधता आणि आढळ - 'सुगंथी देवदासन समुद्री संशोधन संस्था' आणि 'भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था' कडून प्रवाळांच्या ३० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
- ओहोटी - भरती क्षेत्रातील प्रवाळ प्रजाती आणि त्यांचा महाराष्ट्रातील आढळ - आजतागायत कठीण प्रवलांच्या १० प्रजाती आणि मृदू प्रवालांच्या २ प्रजातींची नोंद करण्यात आली.


पाणपक्षी संवर्धन आणि संशोधन
- ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील जैवविविधतेचा प्राथमिक अभ्यास - 'सालीम अली पक्षीविज्ञान एवं प्रकृती विज्ञान केंद्र' यांना हा प्रकल्प देण्यात आला असून या प्रकल्पांतर्गत ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात पक्ष्यांच्या १५५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
- मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकचा फ्लेमिंगो आणि ठाणे खाडीतील इतर पक्षी व आसपासच्या परिसरातील पर्यावरणावर होणारा परिणाम आणि त्यासंबंधी उपाययोजना - हा प्रकल्प ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ यांना देण्यात आला आहे. १ लाख छोट्या रोहित पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच पक्षी अधिवासावर होणारा परिणाम तपासण्यासाठी ३,५०० पक्ष्यांना वळी घालण्यात आली आहे.
- 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील (रायगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्या) तील ९० स्थळांवर सर्वेक्षण केले आहे. जागतिक स्तरावर पक्ष्यांच्या संकटग्रस्त यादीत समाविष्ट असलेले पक्षी या स्थळांवर हिवाळी पाहुणे म्हणून येतात असे आढळले.


सागरी सस्तन प्राण्यांवरील संशोधन
- सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी सस्तन प्राण्यांच्या प्रजातींची स्थिती - ‘कोकण सिटेशियन रिसर्च टीम’ला मिळालेल्या या प्रकल्पात ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पाॅरपाॅईज’ आणि ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन’ या दोन प्रजाती सामान्यपणे सर्व स्थळी आढळल्या तर ६६१ इंडियन ‘ओशन हम्पबॅक डॉल्फिन’ आढळले.
- निळा देवमासा आणि ब्रूडीज देवमाशाचीही नोंद करण्यात आली आहे.

समुद्री साप संशोधन
- ‘दक्षिण प्रतिष्ठान’ यांना प्रकल्प देण्यात आला
- समुद्री सापांच्या ७ प्रजातींची नोंद करण्यात आली. ‘बीकड् समुद्री साप’ आणि ‘शॉ समुद्री साप’ हे विपुल प्रमाणात आढळले.

पाणमांजर संशोधन
- कांदळवनांमधील पाणमांजरांच्या अधिवासाचे संशोधन ‘इला प्रतिष्ठाना’ तर्फे केले जात आहे.
- या प्रकल्पाअंतर्गत सर्वेक्षण केलेल्या १२ नदीमुख/खाड्यांमध्ये ‘स्मूथ कोटेड ऑटर’ या पाणमांजराच्या प्रजातीची नोंद करण्यात आली.
- निकृष्ट दर्जाच्या कांदळवन क्षेत्रात पाणमांजर आढळले नाही.

कांदळवन संशोधन आणि संवर्धन
- ठाणे जिल्ह्यातील कांदळवनांंना बाधा पोहचविणाऱ्या कीटकांचा अभ्यास - कांदळवन वनस्पतींना निष्पर्ण करणाऱ्या कीटकांच्या २० प्रजातींची नोंद केली.
- उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा वापरुन महाराष्ट्राच्या खारफुटीचे निरीक्षण करणे - ‘भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थे’ला प्रकल्प देण्यात आला. उच्च दर्जाचा उपग्रह डेटा वापरुन व्यापक स्वरुपात स्थानिक माहितीचे संकलन करण्यात आले. कांदळवनांचे निरीक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले गेले.


प्रशिक्षुता
‘कांदळवन प्रतिष्ठाना’मधील प्रशिक्षुताचा कालावधी ३ महिन्यांचा आहे. यामध्ये प्रशिक्षुत महाराष्ट्रातील कांदळवन आणि किनारपट्टी व सागरी जैवविविधतेशी संबंधी असलेल्या कामांमध्ये ‘कांदळवन प्रतिष्ठाना’च्या संशोधन गटाला मदत करतात. प्रशिक्षुत्याबाबत अधिक माहिती करिता तुम्ही ‘कांदळवन प्रतिष्ठाना’ला mangrovefn@gmail.com या ईमेल पत्त्यावर लिहू शकता. प्रशिक्षुता ही वरिष्ठांच्या मंजुरीनंतरच मिळेल. तसेच त्यावर अटी व शर्ती लागू असतील.
लघु अनुदान उपक्रम
तरुण संशोधकांना प्रोत्साहित करुन (स्वतंत्र किंवा संस्थांद्वारे) महाराष्ट्राच्या किनारपट्टी आणि सागरी जैवविविधतेवरील वैज्ञानिक संशोधन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘कांदळवन प्रतिष्ठाना’ने एक लघु अनुदान उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये तरुण संशोधकांना विविध संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते.
लघु अनुदान उपक्रम २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ‘कांदळवन प्रतिष्ठाना’ला किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता संवर्धनाच्या विविध पर्यावरणीय बाबींचा समावेश असणाऱ्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रकल्पाचे स्पष्ट परिभाषित उद्दीष्टे, प्रभावी कार्यपद्धती, प्रस्तावित कालावधीच्या दृष्टीने प्रकल्पाची व्यवहार्यता आणि किनारपट्टी व सागरी जैवविविधता संवर्धनाच्या संदर्भात प्रस्तावित अभ्यासाचे महत्त्व या आधारे प्रस्तावांचे मूल्यांकन केले जाते.
‘कांदळवन प्रतिष्ठाना’कडून लघु अनुदान उपक्रमाअंतर्गत मान्यता मिळालेले संशोधन प्रकल्प
अनु. क्र. | प्रकल्प | संस्था / वैयक्तिक संशोधक | प्रकल्प कालावधी | स्थिती | अर्थसंकल्प (₹) |
---|---|---|---|---|---|
१ | महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा अभ्यास करणे | बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी | मार्च २०१७ - फेब्रुवारी २०१९ | पूर्ण | ९०,१५,०००.०० |
२ | महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील कांदळवनांना निष्पर्ण करणाऱ्या किड्यांकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन धोरण तयार करणे | इन्स्टिट्युट ऑफ वूड सायन्स अँड टेकनॉलॉजि | मार्च २०१७ - फेब्रुवारी २०२० | पूर्ण | २०,३७,०००.०० |
३ | अवैध पद्धतीने कापण्यात आलेल्या कांदळवनांची न्यायवैद्यक ओळख करण्यासाठी प्रणाली तयार करणे | इन्स्टिट्युट ऑफ वूड सायन्स अँड टेकनॉलॉजि | मार्च २०१७ - फेब्रुवारी २०२१ | चालू | ३९,८२,०००.०० |
४ | महाराष्ट्र किनाऱ्यांवर आढळणाऱ्या महत्वाच्या कांदळ प्रजातींची त्यांचा लाकूडावरून ओळख पटवणे | इन्स्टिट्युट ऑफ वूड सायन्स अँड टेकनॉलॉजि | मार्च २०१७ - डिसेंबर २०१९ | पूर्ण | २४,३५,०००.०० |
५ | जसाई जवळील उरण पाणथळ आणि ठाणे खाडी फ्लॅमिंगो अभयारण्य येथील किनारी पक्ष्यांमधील विविधता आणि त्यांची अन्न मिळवण्याची पद्धत यावरील संशोधन करणे | बी. एन. बांदोडकर महाविद्यालय | मार्च -2017- डिसेंबर 2017 | पूर्ण | २,९३,०००.०० |
६ | उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा चा वापर करून महाराष्ट्राच्या कांदळवनांच्या स्वास्थ्यावर निगराणी ठेवणे | इंडियन इन्स्टिटूट ऑफ स्पेस, सायन्स अँड टेकनॉलॉजि | मार्च 2018- फेब्रुवारी 2021 | चालू | 77,94,000 |
7 | मुंबईतील कांदळवन प्रजाती आणि सहयोगी प्रजातींचा अभ्यास करणे | आर. डी. आणि एस. डी. नॅशनल कॉलेज | जानेवारी 2018- एप्रिल 2019 | पूर्ण | 61,000 |
8 | एम टी एच एल प्रकल्पाकरिता फ्लॅमिंगो आणि इतर पक्ष्यांच्या स्थलांतरणाविषयी खबरदारी उपाययोजना आणि प्रकल्प क्षेत्रातील पक्षी नोंदणी करणे (द्वितीय वर्ष) | बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी | सप्टेंबर 2017- ऑगस्ट 2027 | चालू | 31,92,73,240 |
एम टी एच एल प्रकल्पाकरिता फ्लॅमिंगो आणि इतर पक्ष्यांच्या स्थलांतरणाविषयी खबरदारी उपाययोजना आणि प्रकल्प क्षेत्रातील पक्षी नोंदणी करणे (तृतीय वर्ष) | बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी | सप्टेंबर 2017- ऑगस्ट 2027 | चालू | 31,92,73,240 | |
9 | महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवाच्या उबवणीकरीताच्या तापमानाचा अभ्यास करणे | श्रीमती सुमेधा कोरगावकर (भारतीय वन्यजीव संस्थान च्या संशोधक) | जानेवारी 2019- ऑक्टोबर 2019 | पूर्ण | 4,58,505 |
10 | महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवाच्या उबवणीकरीताच्या तापमानाचा अभ्यास करणे (सत्र १) | श्रीमती सुमेधा कोरगावकर (भारतीय वन्यजीव संस्थान च्या संशोधक) | नोव्हेंबर 2019- ऑक्टोबर 2020 | पूर्ण | 2,60,000 |
11 | रत्नागिरी जिल्ह्याच्या कांदळवन अधिवासातील पाणमांजर आणि मगरींचा अभ्यास करणे (सत्र २) | इला प्रतिष्ठान | जानेवारी 2019- मार्च 2020 | चालू | 6,56,000 |
12 | वाढत्या मासेमारीचा सागरी सापांच्या अन्न मिळकतीवर परिणाम होतो का? | दक्षिण प्रतिष्ठान | ऑक्टोबर 2018- नोव्हेंबर २०१९ | पूर्ण (लघु अनुदानित) | 4,53,800 |
13 | महाराष्ट्राच्या किनाऱ्यांचा अभ्यास करून एकात्मिक बहूआयामी मत्स्य प्रकल्पाकरीता योग्य जागांची निवड करणे | भा. कृ. अनु. प्र. - राष्ट्रीय खारा जलजीव अनुसंधान संस्थान | सप्टेंबर 2017- ऑगस्ट 2020 | चालू | 40,00,000 |
14 | ऐरोली येथे सागरी शोभिवंत मास्यांचे उबवणी केंद्र तयार करणे | भा. कृ. अनु. प्र. - राष्ट्रीय मत्स्य अनुवांशिक संसाधन ब्युरो | मार्च 2018- फेब्रुवारी 2021 | चालू | 98,26,850 |
15 | खेकडे पालन प्रकल्पाकरिता रायगड येथील जागांचा शोध घेणे | नोरिड - फीस्कोपफेड | डिसेंबर 2017- मार्च 2018 | पूर्ण | 75,000 |
16 | मालवण मारिन अभयारण्यातील सागरी जैवविविधतेचे सर्वेक्षण करणे | श्री. नोआ शिंदे (भारतीय विद्यापीठ, पुणे) | फेब्रुवारी 2019- एप्रिल 2019 | पूर्ण | 60,000 |
17 | रत्नागिरी जिल्यातील सोनगावाचे जैवविविधता आणि निसर्गपर्यटनाकरिता सर्वेक्षण करणे | श्रीमती पूजा सिंग (भारतीय विद्यापीठ, पुणे) | मे 2019- फेब्रुवारी 2020 | पूर्ण | 17,360 |
18 | मल्यूस्क मेरिकलचरचा पर्यायी शाश्वत उपजीविका प्रकल्प म्हणून पालघर जिल्ह्यातील मासेमारांकरिता वापर करणे | श्री. संतोष भेंडेकर, भा. कृ. अनु. प्र. - केंद्रीय समुद्री मत्स्यकी सानुसंधान संस्थान | जानेवारी 2020- जानेवारी 2023 | चालू | 26,62,000 |
19 | महाराष्ट्राच्या खाडीतील कांदळवनांमधील गोबीड मास्यांची विविधता आणि प्रसार करणे | डॉ. उमेश काटवटे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी | जानेवारी 2020-जानेवारी 2021 | चालू | 12,00,000 |
20 | महाराष्ट्र किनाऱ्यावरील ओहोटी-भरतीच्या क्षेत्रातील प्रवाळांच्या अभ्यास करणे | श्री. हर्षल कर्वे, सागरी जीवशास्त्रज्ञ, कांदळवन प्रतिष्ठान | जानेवारी 2019- डिसेंबर 2019 | चालू | - |
21 | महाराष्ट्र किनाऱ्यावरील एलसमोब्रान्चचा अभ्यास करणे (पकडून आणलेले मासे गोळा करण्याच्या स्थळांवरील सर्वेक्षणाच्या आधारे) | श्रीमती धनश्री बागडे, जीवशास्त्रज्ञ, कांदळवन प्रतिष्ठान | एप्रिल 2019- मार्च 2020 | पूर्ण | - |
22 | मुंबईच्या कांदळवनांतील एल- ऍस्परगिनेज तयार करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ओळख आणि अभ्यास करणे | श्रीमती सायली दफ्तरदार, बांदोडकर महाविद्यालय, ठाणे | जानेवारी 2020-जानेवारी 2021 | चालू (लघु अनुदानित) | 4,00,000 |
23 | महाराष्ट्र किनाऱ्यावरील पाकटांच्या मासेमारीची वैशिष्टये, जीवनशैली आणि सामाजिक-आर्थिक महत्व अभ्यासणे | श्रीमती अलीसा बारनेस, स्वतंत्र वैज्ञानिक | जानेवारी 2020-जानेवारी 2021 | चालू (लघु अनुदानित) | 4,99,110 |
24 | महाराष्ट्र किनाऱ्यावरील कासवांच्या अंड्यांवरील आणि पिल्लांवरील लाल मुग्यांच्या हल्ल्याचे व्यवस्थापन करण्याविषयी संशोधन करणे | श्रीमती अनुजा वर्तक, स्वतंत्र वैज्ञानिक | डिसेंबर 2019- जुन 2020 | पूर्ण (लघु अनुदानित) | 23,000 |
25 | सिंधुदुर्ग, महाराष्ट्र मधील वेंगुर्ला रॉक च्या गुहांमधील जैवविविविधतेचा अभ्यास करणे | श्री. शिरीष मानची, सालीम अली पक्षीविज्ञान एवं प्रकृती विज्ञान केंद्र | डिसेंबर 2019 – डिसेंबर 2020 | चालू (लघु अनुदानित) | 5,00,000 |
26 | महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग च्या किनाऱ्यावरील भरती तळ्यांतील जैवविविधतेची नोंद करणे | डॉ. गोल्डिन क्वाड्रोस, सालीम अली पक्षीविज्ञान एवं प्रकृती विज्ञान केंद्र | Dec 2019 – December 2020 | चालू (लघु अनुदानित) | 5,00,000 |
27 | धोकाग्रस्त इलासमोब्रान्च प्रजातींची सिंधुदुर्गातील अंडी घालण्याची स्थळे शोधून काढणे | श्रीमती त्रिशा गुप्ता, दक्षिण प्रतिष्ठान | डिसेंबर 2019 – जुन 2020 | पूर्ण (लघु अनुदानित) | 3,00,000 |
28 | महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ येणाऱ्या हंप-बॅक डॉल्फिनच्या संवर्धनाविषयी अभ्यास करणे तसेच किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या इतर सीटेशीअन्स चा अभ्यास करणे | श्री. मिहीर सुळे, सीएएस - इंडियन इन्स्टिटयूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेकनॉलॉजि | जानेवारी 2020-जानेवारी 2021 | चालू (लघु अनुदानित) | 4,95,000 |
29. | रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या कांदळ प्रजातींचा विस्तार अभ्यासण्याकरिता तेथील खड्यांचे सर्वेक्षण करणे | श्री. गणेश पवार, तुळजाराम चतुर्रचंद महाविद्यालय, बारामती | एप्रिल 2020-एप्रिल 2021 | अध्याप सुरु झाला नाही (लघु अनुदानित) | 2,65,000 |
30. | रायगड आणि सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील व्हेल शार्कचा वावर असलेल्या जागा शोधणे आणि त्याद्वारे तेथील मासेमारी मध्ये सापडणाऱ्या इतर धोकाग्रस्त इलासमोब्रान्च प्रजातींच्या संवर्धन आणि निदेखरेखीत सुधारणा करणे | श्री. स्वप्नील तांडेल, स्वतंत्र वैज्ञानिक | एप्रिल 2020-एप्रिल 2021 | अध्याप सुरु झाला नाही (लघु अनुदानित) | 3,91,000 |