किनारपट्टीवरील जैवविविधतेचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा दृष्टिकोन.
कांदळवन आणि त्यानिगडित अधिवासांचे रक्षण करण्यामध्ये स्थानिक लोक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचा पर्यावरणाशी असलेला सहजीवनाचा संबंध त्याचे मुख्य कारण आहे. निसर्ग पर्यटन हे स्थानिक लोकांना आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संरक्षणाचा एक व्यवहार्य पर्याय उपलब्ध करुन देऊ शकते.
कांदळवन निसर्ग पर्यटन हे स्थानिक समुदायांसाठी उपजीविकेचे साधन होण्यासोबतच कांदळवन अधिवासाबद्दल तुटपुंजी माहिती असणाऱ्या पर्यटकांमध्ये जागृकता निर्माण करण्यातही मदत करते. रायगडमधील काळिंजे आणि दिवेआगर, रत्नागिरीतील आंजर्ले आणि सोनगाव, सिंधुदुर्गमधील तारामुंबरी, मिठमुंबरी आणि निवती यांसारख्या गावांमधील स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यामध्ये कांदळ प्रजातींची ओळख, पक्षी प्रजातींची ओळख, पक्षी निरीक्षणाचे तंत्र, किनारी आणि सागरी जैवविविधतेची ओळख, निसर्ग पर्यटनाची संकल्पना व त्यामधील तत्वे, स्थानिक पदार्थाना अधिक बाजारयोग्य बनवण्याचे प्रशिक्षण, तारका निरीक्षण आणि जीवरक्षण प्रशिक्षण इ. उपक्रमांचा समावेश आहे. कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनाचा हा उपक्रम स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी आणि कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धनास प्रोत्साहित करण्यासाठी हाती घेतलेल्या समुदाय-आधारित संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुरुवातीच्या तांत्रिक आणि आर्थिक पाठिंब्यानंतर, निसर्ग पर्यटनाच्या या प्रकल्पाचे नियोजन संपूर्णपणे स्थानिक समुदायांव्दारे करण्यात येणार आहे.


कांदळवन निसर्ग पर्यटनाची ठळक वैशिष्ट्ये
- स्थानिक समुदायांचा सहभाग
- उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन
- पर्यावरणावर कमी दुषपरिणाम
- पर्यटकांसाठी व्यवहार्य पर्याय
- समुदाय-आधारित संवर्धन
- शिक्षण आणि जनजागृकती
- निसर्ग संवर्धन




मुख्य उपक्रम
- कांदळवन नौका स्वारी
- निसर्ग भ्रमंती / पक्षी निरीक्षण
- कांदळवन भ्रमंती
- किनारा भ्रमंती आणि किनाऱ्यांवरील खडक टाळ्यांमधील जैवविविधतेचे निरीक्षण
- भ्रमंती / नौका स्वारी दरम्यान मत्स्यपालन प्रकल्प किंवा कांदळवन वृक्षारोपणाच्या स्थळांना भेट
- आसपासच्या ऐतिहासिक स्थळांना भेट
- स्थानिक पाककृती आणि पारंपारिक जेवण


‘कांदळवन प्रतिष्ठान’ सध्या निसर्ग पर्यटनाअंतर्गत खालील गावांमध्ये काम करीत आहे. अधिक माहिती मिळण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
जिल्हा | गाव | बचत गटांची (लाभार्थी) संख्या | संपर्कासाठी व्यक्तीचे नाव | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|---|
रायगड | काळिंजे | १ (७) | श्री. विक्रांत गोगरकर | ९२७२८८२४८२ |
दिवेआगर | १ (१०) | श्री. सिद्धेश कोसबे | ७७६९९६२७७९ | |
रत्नागिरी | आंजर्ले | २ (१४) | श्री. तृष्णांत भाटकर | ७०३८४२५७९३ |
सोनगाव | ४ (३४) | श्री. अभिनय केळसकर | ६९३७६५४३२७ | |
सिंधुदुर्ग | तारामुंबरी | १ (१०) | श्री. लक्ष्मण तारी | ७४४७५८००४२ |
मिठमुंबरी | २ (१२) | श्रीमती दुर्गा ठिगळे | ९५९५१९५६९५ | |
वैंगुर्ला | १ (१०) | श्रीमती श्वेता हुले | ८८०६४६५२८६ | |
निवती | ४ (१३) | श्रीमती दुर्गा ठिगळे | ९५९५१९५६९५ | |
आचरा | ३ (९) | श्रीमती दुर्गा ठिगळे | ९५९५१९५६९५ |