इंटरनॅशनल गेसल्सचाफ्ट झुसमेनार्बीट प्रकल्प
जर्मन संघराज्य मंत्रालयाच्या मदतीने पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि अणुशक्तीविषयक सुरक्षेसंबंधी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 'आंतरराष्ट्रीय हवामान पुढाकारा'अंतर्गत प्रदान केलेल्या निधीचा वापर करून 'बीएमयूबी' आणि 'पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालया'च्या संयुक्त विद्यमाने 'डॉईश गेसेल्सशाफ्ट फॉर इंटरनॅशनल झुसमेनार्बीट जीएमबीएच'ला हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी दिली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १२.३ कोटी रुपये होती (डॉशे गसेल्सशाफ्ट इंटरनॅशनल झुसमेनारबीट - ७.८ कोटी रुपये)
'जीआयझेड' अंतर्गत महाराष्ट्रात खालील प्रकल्प राबविण्यात आलेः
किनारपट्टी व सागरी संरक्षित क्षेत्र प्रकल्प
जैविक वैविधता अधिवेशन, आयचि च्या लक्ष्यांना पाठिंबा देणाऱ्या इंडो-जर्मन तांत्रिक संस्थान चा हा एक महत्वाचा प्रकल्प होता. हा प्रकल्प 'पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय', भारत शासन आणि 'डॉशे गसेल्सशाफ्ट इंटरनॅशनल झुसमेनारबीट' यांच्याव्दारे राबविण्यात आला. पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि अणुशक्तीविषयक सुरक्षेकरिताचे जर्मन फेडरल मंत्रालय याने ह्या प्रकल्पास अर्थसहाय्य दिले. सप्टेंबर २०१४ ते एप्रिल २०१७ या कालावधीत हा प्रकल्प कांदळवन कक्षाद्वारे राबवण्यातआला.
महाराष्ट्रातील सागरी संरक्षित क्षेत्राची घोषणा
कॉन्फरर्न्स ऑफ पार्टीस् टू दी कन्व्हेशन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी' या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत सरकारने किनारपट्टी व सागरी संवर्धनाकरीता किनारपट्टी व सागरी संरक्षित क्षेत्राचे जाळे तयार करण्याबाबत रुची दर्शविली. या प्रस्तावित प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि भारतातील सागरी संरक्षित क्षेत्रांच्या विस्ताराची प्रक्रिया सुलभ झाली.
शासकीय प्रतिनिधी, संशोधक आणि स्वयंसेवी संस्था तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय भागीदारांनी दिलेल्या सल्ल्यांतून महाराष्ट्रात तीन सागरी संवर्धन क्षेत्र निश्चित करण्यात आली.
- ठाणे खाडी : ठाणे खाडी २६ किमी क्षेत्रावर पसरलेली आहे. मुंबईच्या दक्षिण-पश्चिम दिशेने ही खाडी प्रवाहित होते आणि उल्हास नदीला ती उत्तर सीमेवर जोडली जाते.
- वेळास ते दाभोळ किनारीपट्टा : हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचा अंदाजे ६० किमी पर्यंत पसरलेला किनारी पट्टा आहे.
- अन्सूरे खाडी : रत्नागिरी जिल्ह्यातील अन्सूरे खाडी ही अंदाजे ६.५ किमी लांब आणि २००-३०० मीटर रुंद आहे.
इंटरनॅशनल गेसेल्सशाफ्ट झुसमेनारबीट' प्रकल्पाची फलनिष्पत्ती
- 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'ची निर्मिती
- किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र, ऐरोली'ची स्थापना
- प्रायोगिक पातळीवरील संरक्षित भागांमध्ये सहभागी व्यवस्थापन प्रक्रिया राबविली
- भागधारकांकरिता क्षमता विकास उपक्रम
- सागरी जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व यावर माहिती, शिक्षण आणि संप्रेषण
जीआयझेड - ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा अंतिम अहवाल - महाराष्ट्र (इंग्रजी)