क्षमता बांधणी
प्रतिष्ठानामार्फत किनारी जिल्ह्यांतील गावकऱ्यांसाठी किनारी व सागरी परिसंस्थांशी संबंधित शाश्वत उपजिविका उपक्रमांकरीता क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात.
उपजिविकेवर आधारित क्षमता बांधणी (प्रशिक्षण) कार्यक्रम
i. जिताडा व काळूंदर माशांचे पिंजरा पालन
ii. गोड्या पाण्यातील व सागरी शोभिवंत माशांचे संगोपन
iii. खेकडा पालन
iv. मुल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती व स्वच्छ हाताळणी
v. कालवे व शिंपले पालन
vi. निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रशिक्षण, ज्यामध्ये निसर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण, जीव वाचविण्याच्या तंत्रांचा समावेश तसेच पॉवरबोट हाताळणी प्रशिक्षण समाविष्ट आहे
वन विभागासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात, ज्यामुळे क्षेत्रीय अंमलबजावणी, निरीक्षण व अंमलबजावणी (एन्फोर्समेंट) क्षमतांना बळकटी मिळते.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम खालील विषयांवर आधारित आहेत :
i. कांदळवन ओळख व रोपवन तंत्र
ii. पक्षी व जैवविविधता सर्वेक्षण पद्धती
iii. सागरी प्राण्यांच्या बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध कारवाईबाबत प्रशिक्षण
iv. सागरी प्राणी किनाऱ्यावर वाहून आल्यावर (स्ट्रॅंडिंग) करायची कार्यवाही
v. सागरी कासवांचे उपचार व बचाव
vi. GIS आधारित नकाशे तयार करणे
vii. कासवमित्रांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
क्षमता बांधणी कार्यक्रमांचा तपशिल
| वर्ष | क्षमता बांधणी कार्यक्रमांची संख्या | लाभार्थी संख्या |
|---|---|---|
| 2018-19 | 17 | 415 |
| 2019-20 | 25 | 818 |
| 2020-21 | 6 | 138 |
| 2021-22 | 44 | 536 |
| 2022-23 | 37 | 566 |
| 2023-24 | 25 | 435 |
| 2024-25 | 15 | 643 |
| 2025-26 | 21 | 783 |
२०२४-२५ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२०२३-२४ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२०२२-२३ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२०२१-२२ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२०२०-२१ मधल्या कार्यक्रमांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती प्रशिक्षण
कांदळवन रोपवन पद्धती आणि GIS mapping प्रशिक्षण
जीवनरक्षक तंत्र व पॉवरबोट हाताळणी प्रशिक्षण