कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

नवीन काय?

नवीन काय ?

कांदळवन प्रतिष्ठानाच्या वार्षिक अहवालाचे (२०२०-२१) प्रकाशन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशन झाले

06/09/2021'

कांदळवन प्रतिष्ठानाच्या वार्षिक अहवालाचे (२०२०-२१) प्रकाशन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाशन झाले (Download PDF)

कांदळवन प्रतिष्ठानाच्या जी आय एस विभागाचा ठाणे खाडीच्या रुंदीतील बदलावरील उपग्रह छायाचित्रांद्वारे करण्यात येणारा अभ्यास

14/06/2021'

खाडी हा नदी आणि समुद्राला जोडणारा प्रदेश असून किनारी परिसंस्थेत त्याची महत्वाची भूमीका आहे. ठाणे खाडीचा पाण्याचा प्रदेश आकुंचत असल्याचे निदर्शनास आल्यावर कांदळवन प्रतिष्ठानाच्या जी आय एस विभागाने याबाबत अभ्यासचा हाती घेतला आहे.

ठाणे खाडी फ्लॅमिंगो अभयारण्यासंबंधित पत्रक

02/02/2021'

ठाणे खाडी फ्लॅमिंगो अभयारण्य आणि किनारी व सागरी जैवविविधता केंद्र , ऐरोली संबंधित एका पत्रकांचे प्रकाशन ०२ फेब्रुवारी २०२१ या जागतिक पाणथळ जागा दिनी मा. श्री. वीरेंद्र तिवारी , अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष आणि श्रीमती नीनू सोमराज उपवनसंराक्षक, कांदळवन कक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता डॉ. प्रवेश पंड्या आणि श्रो. स्टॅलिन दयानंद यांनीही उपस्थिती नोंदवली. 

अधिक माहितीसाठी 

आंजर्ल्यात 'मॅंग्रोव्ह कयाकिंग

26/12/2020'

महाराष्ट्रातील पहिलं 'मॅंग्रोव्ह कयाकिंग' आंजर्ल्यात

अधिक माहिती साठी बघा:
https://www.mahamtb.com/Encyc/2020/12/26/mangrove-Kayaking-started-in-anjarle-village-.html

कांदळवन प्रतिष्ठानाच्या 'सोनरेशिया' त्रैमासिक वृत्तिकेचे प्रकाशन

01/01/2021'

'सोनरेशिया' वृत्तिकेचा भाग १

कांदळवन दिनदर्शिका २०२१

08/01/2021'

दिनदर्शिका २०२१

कांदळवन प्रतिष्ठानच्या एकात्मिक अहवालाचे (आर्थिक वर्ष २०१५-२०२०) मा. श्री. संजय राठोड, मंत्री (वने) यांच्या हस्ते २९ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशन झाले.

29/09/2020'

कांदळवन प्रतिष्ठानच्या एकात्मिक अहवालाचे (आर्थिक वर्ष २०१५-२०२०) मा. श्री. संजय राठोड, मंत्री (वने) यांच्या हस्ते २९ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशन झाले. (Download PDF)

राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

08/08/2020'

महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्षाची घोषणा पांढरी चिप्पी प्रजातीला बहुमान

अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील दुव्यास भेट द्या :

https://www.mahamtb.com/Encyc/2020/8/7/Sonneratia-alba-declared-as-maharashtra-state-mangrove-tree-.html 

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक उत्तम व्यवस्थापित संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

03/08/2020'

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक उत्तम व्यवस्थापित संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. संरक्षित वन क्षेत्रांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारच्या समितीने महाराष्ट्रातील सर्व संरक्षित वनक्षेत्रांना भेट दिली. या समितीमधील सदस्य 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'चे वर्णन करताना म्हणाले की, हे एक उत्तम निसर्ग पर्यटन स्थळ, चांगले मनोरंजन क्षेत्र आणि मोठ्या शहराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी जागा आहे. समितीने काही त्रुटीही दर्शविल्या आहेत. ज्यामुळे 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' अधिक चांगली परिसंस्था तयार होऊ शकेल.

अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील दुव्यास भेट द्या :
https://www.hindustantimes.com/cities/thane-flamingo-sanctuary-sgnp-are-best-managed-protected-areas-in-maha-centre-report/story-zvRMWNBiATorYAclcPntPI.html

रायगड जिल्ह्यातील काळींजे गाव हे पहिले कांदळवन निसर्ग पर्यटन स्थळ आहे.

03/08/2020'

रायगड जिल्ह्यातील काळींजे गाव हे पहिले कांदळवन निसर्ग पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी गावकरी हे पर्यटकांना कांदळवन भ्रमंती, कयाकिंग आणि बोट सफर उपलब्ध करुन देतात. कयाकिंगची सुविधा उपलब्ध असणारे हे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे.

काळींजे निसर्ग पर्यटनावरील मराठी बातम्या

देशातील कांदळवन क्षेत्रातील सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात नोंदविण्यात आली आहे.

03/08/2020'

'भारतीय वन सर्वेक्षण संस्थेने नुकताच आपला 'राज्य वन सर्वेक्षण अहवाल, २०१९' प्रकाशित केला. या अहवालातील विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रात २०१७ ते २०१९ दरम्यान १६.२७ चौ.किमीने वाढ झाली आहे. कांदळवन क्षेत्रात वाढ होण्याच्या निर्देशांकात महाराष्ट्र राज्य भारतात दुसर्‍या क्रमांकावर आहे.

राज्यातील कांदळवनाचे क्षेत्र २०१७ मध्ये ३०४ चौरस किलोमीटर होते. जे २०१९ मध्ये ३२० चौरस किलोमीटरपर्यंत वाढले. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रात १६.२७ चौरस किलोमीटरने वाढ झाल्याने या वाढीच्या दराची देशात दुसर्‍या स्थानी नोंद करण्यात आली आहे. अहवालानुसार या काळात देशातील एकूण कांदळवन क्षेत्रामध्ये ५४ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्राचे योगदान ६.४ % आहे. ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची नोंद आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १४.९७ चौ.कि.मी.ची वाढीची नोंद झाली असून त्यानंतर ठाण्यात १५.६३ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ०.३० चौरस किमीने वाढ झाली आहे.