फाउंडेशनतर्फे मॅन्ग्रोव्ह व सागरी जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये, स्थानिक समुदायांमध्ये तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये रुजविण्यासाठी व्यापक जनजागृती व प्रसार उपक्रम राबविण्यात येतात.
प्रमुख जनजागृती उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत :
- शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मॅन्ग्रोव्ह माहिती केंद्रांना भेटी
- शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रबोधनपर व्याख्याने
- प्रदर्शनांमध्ये माहिती स्टॉल्स
- परिषदांचे आयोजन
- विविध संस्थांमार्फत आयोजित कार्यशाळा / कार्यक्रम
- प्रकाशने व माहितीपट
- रंगमंचीय कार्यक्रम व स्पर्धा
| वर्ष | कार्यक्रमांचा संख्या | सहभागींची संख्या |
|---|---|---|
| 2022-23 | 215 | 26551 |
| 2023-24 | 261 | 44930 |
| 2024-25 | 283 | 30313 |
| 2025-26 | 414 | 52928 |
जनजागृती कार्यक्रमांचा तपशील
आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील कार्यक्रमांची यादी क्लिक करा
आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील कार्यक्रमांची यादी क्लिक करा
आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील कार्यक्रमांची यादी क्लिक करा
आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील कार्यक्रमांची यादी क्लिक करा
आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील कार्यक्रमांची यादी क्लिक करा
महाविद्यालय सहल
शालेय सहल
पक्षीनिरीक्षण
कांदळवन सहलकांदळवन आणि किनारे स्वच्छता उपक्रम
प्रतिष्ठानामार्फत कांदळवन व समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम राबविण्यात येतात ज्याद्वारे किनारी प्रदूषण व घनकचरा व्यवस्थापनात मदत होते .
मुख्य उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत :
१. कांदळवन प्रतिष्ठानाने १० स्वयंसेवी संस्थांबरोबर सामंजस्य करार (MoU) केले असून, त्याद्वारे मुंबई महानगर प्रदेशात नियमितपणे कांदळवन स्वच्छता उपक्रम राबविण्यात येतात.

Details of Awareness programmes
| वर्ष | स्वच्छता उपक्रमांचा संख्या | स्वयंसेवकांची संख्या | संचित कचरा (टन मध्ये) |
|---|---|---|---|
| 2022-23 | 93 | 10078 | 175 |
| 2023-24 | 84 | 10063 | 113 |
| 2024-25 | 160 | 15768 | 116 |
| 2025-26 | 150 | 17021 | 174 |


२. कांदळवन कक्षाने मुंबई महानगर प्रदेश, पालघर व रायगड जिल्ह्यांमध्ये घनकचरा हटविण्यासाठी २३ ठिकाणे निवडली असून, त्या ठिकाणी कचरा हटविण्याकरिता मजूरांची नियुक्त केली आहे.
३. कांदळवन प्नतिष्ठानाने मुंबई महानगर प्रदेशातील ११ कांदळवन क्षेत्रांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण व पुनर्वापरासाठी युनायटेड वे मुंबई यांना परवानगी प्रदान केली आहे. या उपक्रमांतर्गत पुनर्वापरित साहित्यापासून प्रत्येकी सुमारे ५० किलो वजनाचे सात बाक तयार करण्यात आले असून, ते पर्यटकांच्या सुविधेसाठी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात स्थापित करण्यात आले आहेत.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संचित आणि पुनर्वापर केलेल्या घनकचऱ्याचा तपशील
| स्थळ | संचित कचरा (किलो मध्ये) | पुनर्वापर केलेला कचरा (किलो मध्ये) |
|---|---|---|
| वर्सोवा (3) | 53064 | 31760 |
| कार्टर रोड (2) | 3511 | 2774 |
| कोपरखैरणे (4) | 6556 | 5234 |
| भांडूप पंपिंग स्टेशन (2) | 2975 | 2148 |
| एकूण | 66106 | 41916 |
कचरा वियोजन
कचऱ्यापासून तयार केलेले बाकडे