कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

उपजिविकेच्या साधनांमधून कांदळवन संवर्धन

महाराष्ट्र शासनाने २० सप्टेंबर २०१७ पासून महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजिविका निर्माण’ ही योजना सुरू केली. कांदळवन प्रतिष्ठानातर्फे ही योजना गावांमध्ये तयार केलेल्या 'कांदळवन सह-व्यवस्थापन समिती'च्या मार्फत राबविली जात आहे. या योजनेमध्ये गटांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना ९०% अनुदान मिळते , तर वैयक्तिक प्रकल्पाला (१ एकर पेक्षा जास्त खाजगी कांदळवन जमीन असणार्‍या मालकांना) ७५% अनुदान मिळते. या योजनेला २०३० पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. आज पर्यंत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील १७७ गावे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडली गेली आहेत.

अ.क्र. जिल्हा कांदळवन सह-व्यवस्थापन समितींची संख्या
(गावांची संख्या)
लाभार्थ्यांची संख्या
१ पालघर २९ ९१६
२ ठाणे २३ ३७४
३ रायगड ४४ ९०६
४ रत्नागिरी २९ ६८५
५ सिंधुदूर्ग ४८ १,२५६
६ मुंबई उपनगर  ४ ९६
  एकूण १७७ ४,२३३

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील विविध गावांमध्ये पुढील उपक्रम राबविले जात आहेत.

खेकडा शेती:  पेन आणि बॉक्स अशा दोन पद्धतीने खेकडा पालन केले जाते. पेन पद्धतीत खेकड्यांची पिल्ले कांदळवनांमध्ये बारीक जाळीने तयार केलेल्या कुंपणांमध्ये वाढविली जातात. बॉक्स पद्धतीत निमखाऱ्या पाण्याच्या तलावांमध्ये HDPE ने तयार केलेले विशिष्ट बॉक्स तरंगते ठेवून त्यामध्ये खेकड्यांची पिल्ले वाढविली जातात. 

सिंधुदुर्गच्या वैंगुर्ला तालुक्यामधील उभादांडा गावातील चिखली खेकडा बीज उत्पादन प्रकल्प
चिखली खेकडा पालन प्रकल्प, रत्नागिरी
 

कालवे शेती: कालवांच्या शेतीसाठी बांबूंचे किंवा जी आय पाईप पासून तयार केलेले तराफे खाडीत  हवाबंद पिंपांच्या सहाय्यने तरंगते ठेवले जातात. त्यांना मृत कालव्यांचे शिंपले लावलेले दोरखंड बांधले जातात ज्यावर नवीन कालवे तयार होतात.

तरंगत्या तराफ्यांवरील कालव्यांची शेती
तराफ्यांच्या दोरिवरील शिंपल्यांना चिकटलेले कालवे
 

पिंजऱ्यातील मत्स्य शेती : 'भा.कृ.अनु प्र. -केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान' सहकार्याने जिताडा, काळुंदर आणि तांबोशी माशांची मत्स्यशेती खाडीतील जी आय पाईप ने तयार केलेल्या तरंगत्या पिंजऱ्यांमध्ये केली जाते.

जिताडा बीज उत्पादन प्रकल्प, रेडी गाव, वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग  
 जिताडा माशांचा पिंजरा पालन प्रकल्प, मालवण, सिंधुदुर्ग
 
आशियायी जिताडा, लॅटस  कॅल्कॅरिफर  
काळुंदर, इट्रोप्लस सुरतेन्सिस
 

शोभिवंत माशांचे संगोपन: एंजलफिश, गोल्डफिश, गप्पी, स्वॉर्डटेल सारख्या गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांची पिल्ले गावातील स्वंय-सहायता समूहांना देण्यात येतात. या समुहांतर्फे एफआरपी टाक्यांमध्ये या माशांचे संगोपन करण्यात येते.

शोभिवंत मत्स्य पालन प्रकल्प
 गांधीनगर, सिंधुदूर्ग मधील सागरी शोभिवंत मासे पालन प्रकल्प
 

कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन : 'कांदळवन प्रतिष्ठाना'ने महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात निसर्ग पर्यटनाची क्षमता असणारी काही ठिकाणे शोधली आहेत. याठिकाणी नौका स्वारी, निसर्ग भ्रमंती, न्याहारी निवास, पारंपारिक जेवण, इ. उपक्रम सुरू केले आहेत.

Mangrove Safari कांदळवन निसर्ग पर्यटन
Birdwatching  कांदळवन सहल