कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

महाराष्ट्रातील कांदळवन

कांदळवन - एक परिचय

कांदळवन हा वनस्पतींचा एक विशेष गट आहे. ज्यामध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती किंवा वेली, जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. कांदळवने भरती-ओहोटी दरम्यानच्या कठीण पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेतात. जगातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशातील (जवळजवळ ३२° उत्तर आणि ३८° दक्षिण दरम्यान) किनारपट्टी प्रदेशात सापडणारी ही झाडे धोकाग्रस्त असूनही ती सर्वात उत्पादनक्षम अशी परिसंस्था निर्माण करतात. ही परिसंस्था आता अनेक खंडांमध्ये समशीतोष्ण प्रदेशात विस्तारत आहे.

कांदळवनांची घनता समुद्राचे पाणी आणि गोडे पाणी यांची नियमित सरमिसळ होणाऱ्या भागात, २०० सेमीपेक्षा जास्त वार्षिक पाऊस पडणार्‍या भागात, २०° पेक्षा कमी तापमान नसणाऱ्या तसेच तापमानातील बदल ५° पेक्षा जास्त नसणाऱ्या भागात अधिक चांगली दिसून येते.

कांदळवने ही त्यांच्या आकारिकीय, रचात्मक, वैज्ञानिक, बियाणे आणि रोपांच्या बाबतीत इतर वनस्पतींच्या तुलनेत बरीच वेगळी असतात. जमीन आणि समुद्र यांच्यातील संक्रमण क्षेत्रांमध्ये कांदळवनांची वाढ होत असल्याने त्या अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात अनुकूलन दिसते.

कांदळवनांमध्ये दिसणारी काही प्रमुख अनुकूलने खालीप्रमाणे आहेत.

  • भुपृष्ठावरील मुळे - आधार मुळे, श्वसनमुळेआणि केबल मुळे, इत्यादी
  • मीठ उत्सर्जित करणारी पाने
  • पाण्यातून कंदिकांचे विकिरण

जगभरातील खारफुटीचे क्षेत्र १४७,९०० चौ.कि.मी. असून ते 123 देश - प्रदेशांत विस्तारलेले आहे. सध्या जगातील कांदळवन प्रजातींच्या अद्यावत यादीमध्ये १७ गटातील ३० जातींमधील 85 प्रजातींचा समावेश आहे. रेखांशाच्या दृष्टीने जगात कांदळवनांची दोन मुख्य केंद्र आहेत. - 'अंटलांटिक ईस्ट पॅसिफिक'मध्ये (एईपी) ज्यात पश्चिम अमेरिका, पूर्व अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि 'इंडो-वेस्ट पॅसिफिक'मध्ये (आयडब्लयूपी) ज्यात पूर्व-आफ्रिका, इंडो - मलेशिया आणि आॅस्ट्रेलियाचा समावेश होतो. 'आयडब्लयूपी' विभागात कांदळवनांच्या ७१ प्रजाती आढळून येतात, तर 'एईपी' विभागामध्ये १३ प्रजातींची नोंद आहे.

भारतातील नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांच्या किनारपट्टीलगत कांदळवन आढळते. हे कांदळवन ४,९९२ किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. जागतिक कांदळवनांच्या आच्छादनापैकी ३.३ % कांदळवन क्षेत्र भारतामध्ये आहे. जगाच्या तुलनेत भारतामध्ये गेल्या दशकात कांदळवन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ‘भारतीय वन सर्वेक्षणा’नुसार १९८७ ते २०१७ दरम्यान भारतातील कांदळवन क्षेत्रामध्ये अंदाजे ८७५ चौ.किमी वाढ झाली आहे. म्हणजेच कांदळवन क्षेत्रामध्ये ३०.२१ ±८१.७२ चौरस किमी इतकी सरासरी वार्षिक वाढ झाली आहे. २०१३ ते २०१५ दरम्यान ११२ चौरस किमी, तर २०१५ ते २०१७ (एफएसआय २०१७) दरम्यान १८१ किमी इतकी वाढ झाली. 'भारतीय वन सर्वेक्षण'ने (२०२१) नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, कांदळवन आच्छादनामध्ये ३२९ चौरस किमीने वाढ झाली आहे, जी गेल्या सहा वर्षांमध्ये ७२ % वाढ आहे.

राज्य १९८७ १९८९ १९९१ १९९३ १९९५ १९९७ १९९९ २००१ २००३ २००५ २००९ २०११ २०१३ २०१५ २०१७ २०१९ २०२१
आंध्रप्रदेश ४९५ ४०५ ३९९ ३७८ ३८३ ३८३ ३९७ ३३३ ३२९ ३२९ ३५३ ३५२ ३५२ ३६७ ४०४ ४०४ ४०४
गोवा १० १६ १७ २२ २२ २६ २६ २६ २७
गुजरात ४२७ ४१२ ३९७ ४१९ ६८९ ९०१ १०३१ ९११ ९६० ९३६ १०४६ १०५८ ११०३ ११०७ ११४० ११७७ ११७५
कर्नाटक १० १० १२
केरळ 0 0 0 0
महाराष्ट्र १४० ११४ ११३ १५५ १५५ १२४ १०८ ११८ ११६ १५८ १८६ १८६ १८६ २२२ ३०४ ३२० ३२४
ओडिशा १९९ १९२ १९५ १९५ १९५ २११ २१५ २१९ २०७ २०३ २२१ २२२ २१३ २३१ २४३ २५१ २५८
तामिळनाडू २३ ४७ ४७ २१ २१ २१ २१ २३ ३५ ३५ ३९ ३९ ३९ ४७ ४९ ४५ ४४
पश्चिम बंगाल २०७६ २१०९ २११९ २११९ २११९ २१२३ २१२५ २०८१ २१२० २११८ २१२५ २१५५ २०९७ २१०६ २११४ २११२ २११३
अंदमान-निकोबार ६८६ २९७ ९७१ ९६६ ९६६ ९६६ ९६६ ७८९ ६७१ ६७३ ६१५ ६१७ ६०४ ६१७ ६१७ ६१७ ६१६
दमण-दीव 0 0 0 0 0 00 0 0 १.५६
पाॅण्डेचेरी 0 0 0 0 0 0 0 ०.६३
एकूण ४०४६ ४२५५ ४२४४ ४२५६ ४५३३ ४७३७ ४८७१ ४४८२ ४४६१ ४४४५ ४६३९ ४६६३ ४६३२८ ४७४० ४९२१ ४९७५ ४९९२

स्रोत - भारतीय वन सर्वेक्षण अहवाल (१९८७ ते 2021)

तक्ता: भारतीय कांदळवन क्षेत्रातील बदल (२०१५-21)

भारतात कांदळवनांच्या १४ गटातील २२ जातींमधील ४६ प्रजाती आढळतात. भारतातील कांदळवनांचा अधिवास मोठ्या प्रमाणात तीन प्रकारांमध्ये विभागला गेला आहे: डेल्टाइक मॅंग्रोव्ह (पूर्व किनाऱ्यांवरील कांदळवने), इस्टुराईन आणि बॅकवॉटर मॅंग्रोव्ह (पश्चिम किनाऱ्यांवरील) आणि इंसुलार मॅंग्रोव्ह (अंदमान आणि निकोबार बेटांवरील). या तिघांपैकी अंदमान आणि निकोबार बेटांवरील कांदळवने जैवविविधतेच्या दृष्टीने निरोगी आणि सर्वोत्तम आहेत. एकंदरीत, भारताच्या मुख्य भूमीवर कांदळवनांच्या १४ गटातील २२ जातींमधील ४० प्रजाती आहेत. यामधील सर्व ४० प्रजाती या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आढळतात, तर पश्चिम किनारपट्टीवर ११ गटातील १६ जातीमधील २७ प्रजाती सापडतात.

नकाशा - भारतातील कांदळवने

उत्तरेकडे गुजरातच्या सीमेस लागून असलेल्या झई खाडीपासून दक्षिणेस गोव्याच्या सीमेवर असणाऱ्या तेरेखोल नदीपर्यंत महाराष्ट्राची ७२० कि.मी लांब किनारपट्टी पसरलेली आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल, २०२१ नुसार राज्यातील कांदळवनांचे क्षेत्रफळ ३२४ चौ.किमी आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रात कांदळवनांच्या ११ गटातील १५ जातींमधील २० प्रजाती आढळतात. महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या सात जिल्ह्यांमध्ये कांदळवनांचे क्षेत्र विस्तारले आहे.

सारणी - महाराष्ट्रातील वन क्षेत्रामध्ये झालेला बदल (क्षेत्र चौ. किमीमध्ये)

स्त्रोत - भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021

जिल्हा २००५-१३ २०१५ २०१७ २०१९ २०२१
मुंबई
मुंबई उपनगर ४३ ४८ ६४ ६४.३ ६३.२२
ठाणे ५३ ५९ ९० ९०.६६ ८९.६८
रायगड ६२ ७७ १०६ १२०.९७ १२६.९९
रत्नागिरी २३ २९ ३० ३०.१५ ३०.३३
सिंधुदुर्ग १२ १२.१९ १२.०७
एकूण १८६ २२२ ३०४ ३२०.२७ ३२४.२९

नकाशा - महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रामध्ये झालेला बदल (स्त्रोत : एफएसआय-आयएसएफआर)

सारणी - महाराष्ट्रातील कांदळवन प्रजातींची यादी

क्रं. नाव सामान्य नाव स्थानिक नाव स्थान
१. एव्हिसेंनिया मरीना (फोर्स्क.) विरेह. ग्रे मॅंग्रोव्ह तिवर महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
एव्हिसेंनिया ऑफिसिनेलिस एल. इंडियन मॅंग्रोव्ह तिवर महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
३. ब्रूगेरा सिलेंड्रिका (एल.) ब्ल्यूम ऑरेन्ज म्रॅंग्रोव्ह कांदळ महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
४. ब्रुगेइरा जिम्नोरायझा (एल.) लाम. ब्रॉड रेड ऑरेन्ज म्रॅंगोव्ह कांदळ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिह्यात
५. सेरिऑप्स टॅगल सी. बी. रॉब स्पर मॅंग्रोव्ह कांदळ महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
६. कॅण्डेलिया कॅंडल ड्रूस नॅरो लिवड कॅंडल कांदळ रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात
७. राईझोफोरा अपिकुलाटा ब्ल्यूम रेड मॅंग्रोव्ह कांदळ रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हा
८. राईझोफोरा म्यूक्रोनाटा लॅम. एशियाटिक मॅंग्रोव्ह कांदळ महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
९. सोन्नेरेशिया अल्बा ग्रिफ. स्विट सॅण्टेड मॅंग्रोव्ह ॲपल पांढरी चिप्पी महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
१०. सोन्नेरेशियाअपेटला बुच.-हॅम. स्माॅल फ्रुटेड् मॅंग्रोव्ह ॲपल सोन चिप्पी महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
११. सोन्नेरेशिया कॅसीओलेरिस (एल.) एंजिल. रेड फ्लावर्ड् मॅंग्रोव्ह ॲपल लाल चिप्पी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा
१२. एजिसिरॉस कॉर्नीक्युलॅटम (एल.) ब्लान्को रिव्हर मॅंग्रोव्ह सुंगधा महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
१३. झायलोकार्पस ग्रॅनाटम जे. कोएनिग कॅनबाॅल मॅंग्रोव्ह भेलांड रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्हा
१४. सायनोमेट्रा इरिपा काॅस्टेल. व्रिंक्लेड् पाॅड मॅंग्रोव्ह इरापु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा
१५. हेरिटेरा लिटोरॅलिस आयटन. सुंदरी सुंदरी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये
१६. एक्झोकेरिया अगालोका एल. मिल्की मॅंग्रोव्ह हर्षी महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
१७. डॉलीकॅन्ड्रॉन स्पॅथेसीया (एल.एफ.) के. शुम मॅंग्रोव्ह ट्रमपेट तुई/घोरशिंग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा
१८. लुमनिटझेरा रेसिमोसा विलड. ब्लॅक मॅंग्रोव्ह किरपा महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये
१९. अ‍ॅक्रॉस्टिकम ऑरियम एल. मॅंग्रोव्ह फर्न - केवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
२०. अ‍ॅकॅन्थस इलिसिफोलियस एल. हाॅली मॅंग्रोवह मारांडी महाराष्ट्रातील सर्व किनारी जिल्ह्यांमध्ये

दोन प्रजाती उदा. ब्रुगुएिरा परवीफ्लोरा आणि अ‍ॅव्हिसेंनिया अल्बा महाराष्ट्रात आढळतात. मात्र, त्यांच्या अस्तित्वाची तपासणी करणे आवश्यक आहे.

कांदळवन प्रजाती

माननीय मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवनांच्या संरक्षणासाठी, ६ ऑक्टोबर २००५ रोजी महाराष्ट्रात असलेल्या सर्व कांदळवनांना ‘संरक्षित वने’ म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार मुंबई व त्याच्या आसपासच्या ५,४६९ हेक्टरवर पसरलेल्या कांदळवनांना ‘संरक्षित वने’ म्हणून सूचित केले गेले. राज्य सरकारने २०१३ मध्ये सरकारी जमिनींवरील कांदळवनांचा दर्जा ‘संरक्षित वनां'वरून ‘राखीव वन’ असा करण्याचा निर्णय घेतला. 

जिल्हा

भारतीय वनसंरक्षण कायदा, १९२७ च्या कलम ४ अंतर्गतचे

क्षेत्रफळ (हेक्टर)

भारतीय वनसंरक्षण कायदा, १९२७ च्या कलम २० अंतर्गतचे

क्षेत्रफळ (हेक्टर)

मुंबई शहर २७६.६५० २७६.६५०
मुंबई उपनगर ३,६३७.८४९ ३,०९०.९४७
ठाणे ३,५४१.५२५ २,०१३.५३०
सिंधुदुर्ग ४८७.३६१ ३७४.५५०
पालघर ३,०७३.५९० २,०५८.८४४
रायगड ६,४५६.९३१ २,३०२.०९३
रत्नागिरी २,२८६.२७७ १,४३२.७१०
एकूण १९,७६०.१८१ ११,५४९.३२०

सारणी - महाराष्ट्रातील राखीव कांदळवन क्षेत्राची व्याप्ती

कांदळवन व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या हेतूने केलेल्या तीन शिफारसी पुढीलप्रमाणे आहेत: (१) खाजगी जागेचे भूसंपादन (ज्यावर कांदळवनांचा अधिवास आहे), (२) कांदळवनांचे कायदेशीर संरक्षण आणि (३) कांदळवन पुनर्वसन प्रकल्प.

कांदळवन परिसंस्थेचे संरक्षण आणि पुनर्वसनासाठी चांगले उदाहरण म्हणून नेहमीच भारताचे उदाहरण दिले जाते (भट्ट आणि काथीरसन २०१२). ‘भारतीय वन कायदा’ १९२७, ‘वन (संवर्धन) कायदा १९८०’, ‘वन्यजीव (संरक्षण) कायदा १९२७’, १९८६ च्या ‘पर्यावरण संरक्षण कायद्या’अंतर्गत ‘किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) अधिसूचना’ (२०११) सीआरझेड (२०१९), १९९४ ची ‘पर्यावरणविषयक प्रभाव मूल्यांकन अधिसूचना’ (ईआयए) आणि २००५ च्या ‘किनारपट्टी जलचर प्राधिकरण कायद्या’अंतर्गत भारतातील कांदळवनांचा अधिवास कायदेशीररित्या सुरक्षित करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त विविध राज्यांच्या वन विभागाने कांदळवनांच्या पुनर्वसनाचे कार्य हाती घेतले आहे.

कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाने महाराष्ट्र राज्यातील कांदळवन क्षेत्रात वाढ करण्यासाठी निकृष्ठ दर्जाच्या वनक्षेत्रावरील कांदळवन लागवडीवर प्राथमिक लक्ष केंद्रीत करुन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांमध्ये कांदळवन लागवड सुरू केली आहे. उदा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कांदळवन वृक्षारोपण हे श्रम-केंद्रित काम आहे. कांदळवन लागवड कार्यक्रमामध्ये किनारपट्टीभागात कांदळवनांच्या रोपवाटिकांचा विकास करणे आणि निकृष्ठ दर्जाच्या जमिनीवर वृक्षारोपन करणे, यांचा समावेश आहे. कांदळवनांच्या लागवडीची प्रक्रिया बरीच दमवणारी आहे. कारण, यामधील लागवडीच्या प्रत्येक टप्प्यांमध्ये खूप कष्टाचे काम करावे लागते. कांदळवन लागवडीच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या हंगामात कांदळवन प्रजातीच्या बीया/कंदिका गोळा करणे, गोळा केलेल्या कंदिका पिशव्यांमध्ये लावणे, पाण्याचा प्रवाह वाहू देण्यासाठी आणि लागवड केलेल्या रोपट्यांची वाढ सुनिश्चित करण्यासाठी छोटे कालवे खोदणे, अशा पद्धतीचे काम केले जाते. ह्या लागवडीची देखभाल पुढील सात वर्ष केली जाते. कांदळवनांच्या वनीकरणाचे दोन हेतू आहेत. एक म्हणजे निकृष्ट दर्जाच्या कांदळवन जमिनींवर कांदळवनांची पुनर्लागवड करणे आणि स्थानिक समुदायांसाठी उपजीविका निर्माण करणे.

 जिल्हानिहाय कांदळवन आच्छादन आलेख
 
महाराष्ट्रात जिल्हावार कांदळवन आच्छादन
Sr no Districts 2009 2015 2017 2019 2021
VDM MD OM एकूण VDM MD OM एकूण VDM MD OM एकूण VDM MD OM एकूण VDM MD OM
एकूण
1 मुंबई शहर 0 0 2 2 0 0 2 2 0 0 2 2 0 0 2 2 0 0 2 2
2 मुंबई उपनगर 0 23 20 43 0 24 24 48 0 27 37 64 0 27 37.3 64.3 0 26.97 36.25 63.22
3 रायगड 0 10 52 62 0 10 67 77 0 12 94 106 0 12 108.97 120.97 0 15.30 111.69 126.99
4 रत्नागिरी 0 12 11 23 0 15 14 29 0 15 15 30 0 15 15.15 30.15 0 14.96 15.37 30.33
5 सिंधुदुर्ग 0 2 1 3 0 5 2 7 0 5 7 12 0 5 7.19 12.19 0 5 7.07 12.07
6 ठाणे 0 22 31 53 0 25 34 59 0 29 61 90 0 29 61.66 90.66 0 27.75 61.93 89.68
  एकूण 0 69 117 186 0 79 143 222 0 88 216 304 0 88 232.27 320.27 0 89.98 234.31 324.29
(VDM-Very Dense Mangroves, MD-Moderately Dense, OM-Open Mangroves)   (चौरस किमी क्षेत्रफळ)
स्रोत - भारतीय वन सर्वेक्षण अहवाल (2009 ते 2021)

महाराष्ट्रातील कांदळवन आच्छादन आकडेवारी

 
महाराष्ट्रातील कांदळवन आच्छादन
मुंबई 2017
 
पालघर 2017
रायगड 2017
 
रत्नागिरी 2017
सिंधुदुर्ग 2017
 
ठाणे 2017