महाराष्ट्राची किनारी आणि सागरी जैवविविधता
महाराष्ट्राला ७२० कि.मी लांब किनारा लाभला आहे. ज्यामध्ये खाडी, कांदळवने, खडकाळ किनारे, चिखलयुक्त जमीन, वालुकामय किनारे, प्रवाळ भित्ती अधिवास आहेत. या प्रत्येक अधिवासाचे स्वतःची खास वैशिष्ठे आहेत. या क्षेत्रामध्ये एकपेशीय जीवांपासून व्हेल शार्क आणि जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी निळा देवमाशासारख्या अनेक जीवांचा अधिवास आहे.
ह्या परिसंसंस्थेला समजून घेण्यासाठी आम्ही तिला दोन विभागात विभागले आहेत, भरती-आहोटी दरम्यानचा प्रदेश आणि खुला समुद्र
भरती-आहोटी दरम्यानचे क्षेत्र
भरती-आहोटी दरम्यानचे क्षेत्र हा एक अनन्य साधारण अधिवास आहे, जो भूमीला समुद्राशी जोडतो. हा अधिवास भरतीच्या कालावधीत पाण्याखाली राहतो आणि आहोटीच्या वेळेत प्रकाशझोतात येतो.या परिसंस्थेमध्ये खडकाळ किनारे, वालुकामय किनारे, कांदळवन आणि चिखलयुक्त जमिनीसारख्या अधिवासांचा समावेश आहे. या भागामध्ये वनस्पती (शैवाल) आणि जीवजंतू (खेकडे, पाॅलीकीट्स, स्पॉंज, हायड्राॅइड्स, माॅलस्क) आढळतात. ज्यांनी या परिक्षेत्रातील प्रतिकूल वातावरणाशी स्वत:ला अनुकूलीत केले आहे आणि त्याठिकाणी जटिल खाद्य परिसंस्था तयार केली आहे.
काही प्रातिनिधिक प्रजाती खाली दर्शविल्या आहेत.
अरबी काउरी (मॉरिशीया अरेबिका)
वाळूचा बबलर: सैनिक खेकडा (डॉटिला प्रजाती)
झूॲनथस सॅन्सिबॅरिकस
खुला समुद्र
खुला समुद्र म्हणजे विशाल सागरी परिक्षेत्र ज्यामध्ये सागरी पाण्याच्या विविध विभागांचा समावेश आहे. पाण्याच्या खोलीनुसार हे क्षेत्र ५ विभागांमध्ये विभागले गेले आहे. फायटोप्लँक्टन या परिसंसंस्थेत, जमिनीवर असलेल्या झाडांप्रमाणे प्राथमिक उत्पादकांचे काम करतात. सूक्ष्म जीवांचा आणखी एक महत्वाचा गट म्हणजे झूप्लँक्टन. ज्यामध्ये बहुतांश प्रोटोझोन्स, सागरी प्राण्यांच्या अळ्या, माशांची अंडी आणि जेलीफिश या सर्वात मोठ्या प्लँक्टनचा समावेश होतो. हे जीव सागरी अन्न साखळीची सुरवात करतात. ही परिसंस्था मासे, सागरी सस्तन प्राणी, कासव, समुद्र साप, माॅलस्क, क्रस्टेशियन्स यांसारख्या जीवांना पोहण्याासाठी एक मोकळ्या स्वरुपाची मोठी जागा निर्माण करुन देते.
काही प्रातिनिधिक प्रजाती पुढीलप्रमाणे




महाराष्ट्राची किनारपट्टी आणि सागरी जैवविविधतेचा परिचय (ई-पुस्तक)
ऐरोलीतील ‘किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा’मध्येही विक्रीसाठी उपलब्ध आहे.